Home मुंबई 🛑 “कराची स्वीटस” ला मनसेचा दणका – पाठवली थेट कायदेशीर नोटीस 🛑

🛑 “कराची स्वीटस” ला मनसेचा दणका – पाठवली थेट कायदेशीर नोटीस 🛑

102
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 “कराची स्वीटस” ला मनसेचा दणका – पाठवली थेट कायदेशीर नोटीस 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕ मुंबईत मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता ‘कराची स्वीट्स’ नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना दणका दिला आहे.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी या दुकान चालकाला थेट न्यायालयात खेचणार आहे. त्याबद्दल नोटीसही कराची स्वीट्स व्यवस्थापकांना पाठवलेली आहे. मुंबईत कराची स्वीट्स नावाने दुकानं सुरू असल्याचे निर्दशनास आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.

‘देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानची राजधानी कराची या नावाने बहुचर्चित ‘कराची स्वीट्स’ या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे.

त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेचू पोहोचून हा व्यवसाय केला जात आहे’, असा आक्षेप मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी घेतला आहे. या प्रकाराबद्दल हाजी शेख यांनी कराची व्यवस्थापनाला एक पत्र लिहून तात्काळ नाव हटवण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर एक कायदेशीर नोटीस सुद्धा हैदराबाद येथील कराची स्वीट्स व्यवस्थापकांना देण्यात आलेली आहे…⭕

Previous article🛑 “कराची स्वीटस” ला मनसेचा दणका – पाठवली थेट कायदेशीर नोटीस 🛑
Next article🛑 मराठा आरक्षणासाठी ” सर्वोच्च न्यायालयात” चौथ्यांदा अर्ज सादर करणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here