• Home
  • 🛑 “कराची स्वीटस” ला मनसेचा दणका – पाठवली थेट कायदेशीर नोटीस 🛑

🛑 “कराची स्वीटस” ला मनसेचा दणका – पाठवली थेट कायदेशीर नोटीस 🛑

राजेंद्र पाटील राऊत

🛑 “कराची स्वीटस” ला मनसेचा दणका – पाठवली थेट कायदेशीर नोटीस 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕ मुंबईत मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता ‘कराची स्वीट्स’ नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना दणका दिला आहे.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी या दुकान चालकाला थेट न्यायालयात खेचणार आहे. त्याबद्दल नोटीसही कराची स्वीट्स व्यवस्थापकांना पाठवलेली आहे. मुंबईत कराची स्वीट्स नावाने दुकानं सुरू असल्याचे निर्दशनास आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.

‘देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानची राजधानी कराची या नावाने बहुचर्चित ‘कराची स्वीट्स’ या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे.

त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेचू पोहोचून हा व्यवसाय केला जात आहे’, असा आक्षेप मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी घेतला आहे. या प्रकाराबद्दल हाजी शेख यांनी कराची व्यवस्थापनाला एक पत्र लिहून तात्काळ नाव हटवण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर एक कायदेशीर नोटीस सुद्धा हैदराबाद येथील कराची स्वीट्स व्यवस्थापकांना देण्यात आलेली आहे…⭕

anews Banner

Leave A Comment