Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी उंद्री प.दे.शाळापूर्व तयारी अभियानाअंतर्गत प्रवेश दिंडी...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी उंद्री प.दे.शाळापूर्व तयारी अभियानाअंतर्गत प्रवेश दिंडी व पालक मेळावा संपन्न.

295

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी उंद्री प.दे.शाळापूर्व तयारी अभियानाअंतर्गत प्रवेश दिंडी व पालक मेळावा संपन्न.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी उंद्री प.दे. येथे शाळापुर्व तयारीअभियाना अंतर्गत प्रवेश दिंडी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. गावातील ज्या मुलांचे वय शाळेत घालण्या योग्य झालेले आहे अशा पालकांचा मेळावा घेऊन त्या पालकांना शाळेचे महत्व पटवुन आपल्या पाल्यास शाळेत लवकर प्रवेश घेण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या.प्रवेश प्रकिया कशाप्रकारे करायचे आहे व सुट्यात आपल्या मुलांकडुन शाळेची सवय आवड निर्माण व्हावी म्हणून कार्ड वाटप करण्यात आले त्यावर चित्र रेखाटने, रंग भरणे,वस्तुंची ओळख होणे,वगैरे अनेक उपक्रम क्रियाशील पद्धतीने करुन घेणे अशा जवळपास सहा सात टेबल लावुन प्रदर्शित करण्यात आले होते. अभियानाचे उद्घाटन आकाश पाटील वडजे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक कोंदापुरे एन. एन.,खोले एस. जे.(स.शि.) शेख हानिफाबी (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष), अंगणवाडी सेविका बोडके एम. बी. कंनजे मॅडम, कोत्तावाड मॅडम, पसारे मॅडम आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Previous article“अवैध वृक्षतोड प्रकरणी स्वाभिमानी चा तहसील वर आक्रमक पवित्रा”
Next articleउद्योजक संजय बियाणी यांच्या निर्घृण हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक – पालकमंत्री अशोक चव्हाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.