Home Breaking News 🛑 *इ.स. १७९१ मध्ये इंग्रजांच्या कॅप्टन मूर याने पुणे दरबाराला भेट दिली...

🛑 *इ.स. १७९१ मध्ये इंग्रजांच्या कॅप्टन मूर याने पुणे दरबाराला भेट दिली तेव्हा….! पेशव्यांच्या “गणपती रंगमहालाचे” वर्णन केले आहे ते असे* 🛑

114
0

🛑 *इ.स. १७९१ मध्ये इंग्रजांच्या कॅप्टन मूर याने पुणे दरबाराला भेट दिली तेव्हा….! पेशव्यांच्या “गणपती रंगमहालाचे” वर्णन केले आहे ते असे* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

इतिहास :⭕”पुण्याच्या राजवाड्यात (शनिवारवाड्यात) त्यांची (पेशव्यांची) खोली (सभागृह) उत्कृष्ट आहे. तिला गणेश महाल म्हणतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या वेळी त्याला आदर दाखवण्यासाठी अनेक अभ्यागत येतात. त्यांचे पेशवे स्वावागत करतात. मी तिथे एकाच वेळी शंभरहून अधिक नृत्य करणाऱ्या युवती पहिल्या. या सभागृहाच्या एका टोकाला सोन्याचा मुलामा दिलेली एका कोनाड्यात मूर्ती आहे. मला वाटते ती देवता संगमरवरात घडवलेली असावी.

या देवतेभोवती आणि अन्य पौराणिक देवतांभोवती आरास केलेली असावी. अगदी दुसऱ्या टोकाला एक पाण्याची अरुंद नळी असून त्यातून कारंजे उडत आहेत. ती सुवासिक फुलांची उघडी बाग असावी. तिच्यात कारंजांची झुळझुळ चाललेली दिसली एकूण वातावरण फार रम्य होते. या सभागृहातील पुणे दरबाराचा विहंगम देखावा मिस्टर डॅनियल यांनी काढलेल्या सुरेख चित्रात उत्तमरीत्या वठला आहे. यात एकत्र जमलेला जमाव, त्यांची भिन्न व्यक्तिमत्वे आणि हरतऱ्हेचे पोषाख हे पौर्वात्य संस्कृतीचे विशेष अगदीच अतुलनीय आहेत.

हे चित्र श्रीमंत पेशव्यांच्या पुणे दरबारात इंग्रजांचा वकील असलेल्या सर चार्ल्स मॅलेटसाठी मिस्टर डॅनियल याने दिवंगत चित्रकार मि. वेल्स यांच्या रेखाटनांवरून रंगविले व पूर्ण केले. चित्रकाराने मुद्दाम जेव्हा सर चार्ल्स मॅलेट हा आपल्या सहकाऱ्यांसोबत वकील म्हणून पेशव्यांच्या दरबारात जेव्हा हजर होता, तीच नेमकी वेळ टिपली आहे.

यावेळी ग्रेट ब्रिटन आणि श्रीमंत पेशवे यांनी मंजूर केलेल्या मैत्रीच्या तहावर उभयतांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि नंतरच टिपूविरुद्ध युद्धाची तयारी केली, पुढे या त्रिपक्षीय सत्तांनी इ.स. १७९० मध्ये टिपूविरुद्ध संयुक्त मोहीम काढली”…..⭕

Previous article🛑 OnePlus चा स्वस्त फोन Nord N100 लाँच, किंमत २० हजारांपेक्षा कमी 🛑
Next article*मोटारसायकलींची समोरासमोर धडक एक ठार तर दोन जखमी.*.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here