Home Breaking News *मोटारसायकलींची समोरासमोर धडक एक ठार तर दोन जखमी.*.

*मोटारसायकलींची समोरासमोर धडक एक ठार तर दोन जखमी.*.

92
0

*मोटारसायकलींची समोरासमोर धडक एक ठार तर दोन जखमी.*.
जाहूर ,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड नजीक दोन मोटरसायकल स्वारांचा समोरासमोर अपघात झाला असून एकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झालेला आहे यात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे ही घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता घडलीआहे. मयत बापूराव माणिकराव त टाळी कोटे वय ४२ वर्षे राहणार कोटग्याळ व सर्जेराव निवृत्ती देवकते वय २५ वर्ष राहणार हुलगुंडे वाडी हे दोघे दुचाकी क्रमांक MH ४२AW३८०१ या गाडीवर मुखेड कडून बाजार खरेदी करून गावाकडे जात होते त्याच वेळी समोरच्या दिशेने विठ्ठल राठोड राहणार निजामाबाद हे आपल्या नवीन मोटरसायकलवर येत होते मुखेडच्या जवळच असलेल्या भारत पेट्रोल पंप जवळ या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली या भयंकर अपघात कोटग्याळ येथील रहिवासी बापूराव माणिकराव टाळी कोटे आपल्या वाहना वरून खाली आपटले याच वेळी मुखेड च्या दिशेने येणारे MH १६AE९०११या ट्रकच्या खाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीवर असलेले सर्जेराव देवकते व समोरच्या दिशेने मुखेड कडे येत असलेले विठ्ठलराठोड हे दोघे जखमी झाले आहेत त्यांना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणपत चित्ते पोलिस जमादार धोंडीबा चोपेवाड व पोलीस कर्मचारी किरण वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मयत बापूराव टाळी कोटे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा तीन मुली आहेत घटनेची माहिती कोटग्याळ गावात समजताच गावकर्‍यांनी व नातेवाइकांनी ताबडतोब मुखेड गाठले परिवारातील सदस्यांनी एकच टाहो फोडला घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बापूराव यांच्या पार्थिवाचे उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी खोड्याळ येथे करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Previous article🛑 *इ.स. १७९१ मध्ये इंग्रजांच्या कॅप्टन मूर याने पुणे दरबाराला भेट दिली तेव्हा….! पेशव्यांच्या “गणपती रंगमहालाचे” वर्णन केले आहे ते असे* 🛑
Next articleदेगलूर तालुक्यात आगीत लाखो रुपयांची वितहानी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here