• Home
  • IPL: मुंबई इंडियन्सला हवा होता धोनी ; पण या मोठ्या खेळाडूमुळे झाली गोची

IPL: मुंबई इंडियन्सला हवा होता धोनी ; पण या मोठ्या खेळाडूमुळे झाली गोची

IPL: मुंबई इंडियन्सला हवा होता धोनी ; पण या मोठ्या खेळाडूमुळे झाली गोची

प्रतिनिधी =किरण अहिरराव

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जसोबत IPL च्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून आहे. २००८ पासून तो संघाचे नेतृत्व करीत आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणू ओळखला जातो. मात्र, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मुंबई इंडियन्समधून खेळताना दिसला असता, जर सुरुवातीला आयपीएलचे नियम निश्चित नसते. आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या लिलावात महत्त्वाचे खेळाडू त्यांच्या घरच्या फ्रँचायझीशी संबंधित होते. सौरव गांगुली केकेआरसोबत, सचिन तेंडुलकर मुंबईसोबत, वीरेंद्र सेहवाग दिल्लीसोबत, मात्र धोनीचा घरचा संघ नव्हता, त्यामुळे सर्व फ्रँचायझी त्याला घेण्यास इच्छुक होते.

२००७ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या महेंद्रसिंह धोनीला मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या संघात घेण्यास उत्सुक होता. मात्र, मुंबईने प्रथम सचिनला विकत घेतल्यामुळे मुंबईचा संघ धोनीला विकत घेऊ शकला नाही. एन श्रीनिवासन म्हणाले, ही अंकगणिताची गोष्ट आहे. पंजाब युवराजसह, दिल्ली सेहवागसह आणि मुंबई सचिनसोबत खेळणार नाही, असा कोणी विचार पण करत नव्हता. आणि सचिन दुसऱ्या संघासोबत कसा खेळला असता.

श्रीनिवासन पुढे म्हणाले की युवी, सेहवाग, सचिन, गांगुली यासारख्या खेळाडूंसाठी त्यांच्या राज्य फ्रँचायझींनी लिलावातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपेक्षा १० टक्के अधिक रक्कम दिली. त्याच वेळी मला याबद्दल माझे स्पष्ट मत झाले होते की मला धोनीला संघात घ्यायचे आहे. लिलावात फ्रँचायझीला केवळ ५ मिलियन डॉलर्स खर्च करण्याची परवानगी होती. मुंबईने तेंडुलकरला यापूर्वी १.६५ मिलियन डॉलर्सला विकत घेतले होते, त्यामुळे धोनीसाठी त्यांना १.५ मिलियन डॉलर्स खर्च करता आले नाही. दुसरीकडे, सीएसकेकडे एकही मार्की प्लेयर नव्हता. त्यामुळे चेन्नईने धोनीला १.५ मिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले. पैशांचे गणित जुळत नसल्यामुळे मुंबईला धोनी मिळाला नाही, असे श्रीनिवासन म्हणाले.

anews Banner

Leave A Comment