• Home
  • *आजच्या दुसऱ्या दिवसाचा गणपती नाशिकचा नवसाला पावणारा नवश्या* नाशिक,

*आजच्या दुसऱ्या दिवसाचा गणपती नाशिकचा नवसाला पावणारा नवश्या* नाशिक,

*आजच्या दुसऱ्या दिवसाचा गणपती नाशिकचा नवसाला पावणारा नवश्या* नाशिक, विष्णू अहिरे ( विभागीय संपादक युवा मराठा न्यूज़ नासिक) नाशिक मधिल आनंदवली परिसरात गंगापुर रोड ला गोदावरी काठी असलेले नवश्या गणपती मंदीर, सर्व भक्तांना नवसाला पावतो अशी श्रध्दा लोकांची आहे, नाशिक मधिल हे जागृत देवस्थान मानले जाते म्हणू नच नवश्या गणपती हे नाव पडले, सुंदर अश्या या मंदिराला पेशवे कालीन इतीहास आहे सुमारे 300 वर्षापुर्वी पेशव्यानी मंदिराची स्थापना केली, गोदावरी नदीच्या तिरी पुर्वभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी गणेश मुर्ती आहे, पेशवाई बुडाल्या नंतर त्यानी बांधून ठेवलेले राजवाडे ही जाळले मात्र परिसरातील मंदिरे मात्र शाबीत राहिली त्यातील हे नवश्या गणपती मंदीर हे आजही पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष म्हणून दिमाखात उभे आहे, मंदीर गोदावरी काठी असल्यामूळे पुराचा तडाखा नेहमी बसत असे म्हणून १९८८ साली युवराज जाधव व आनंदवली परिसरातील नागरीकानी या मंदिराचा जिर्नोधार केला व ते गरजेचे होते, आतिशय भक्कम असे हे मंदीर आज उभे आहे, रोज अनेक भाविक गणपतीला नवस करणेसाठी येत असतात, मंदीर प्रशासना ने आतिशय चांगल्या सोयी सुविधा येथे केल्या आहेत,संकष्ट चतुर्थी, अंगारका चतुर्थी ला या गणेश मंदिरात खुप मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते,यावेळी मंदीर व्यवस्थापना कडून 5000 किलो प्रसाद वाटला जातो, गर्दी असुनही शिस्तबध्द रितीने भाविकांना दर्शन दिले जाते, महिला पुरुष यांचे साठी वेगळ्या दर्शन रांगा ठेवण्यात आल्या आहेत,मंदीर व्यवस्थापन समितीने येथे अभीशेक व सत्यनारायण पूजे साठी सोय केलेली आहे, नवश्या गणपतीचे दर्शना साठी दूर वरुण भाविक येत असतात, हे मंदीर हिन्दु मुस्लीम एकजुटीचं येक चांगले उदाहरण आहे, गणपती मंदीर प्रवेशद्वारा जवळ हज्रत पिर सन्जेशाह हुस्सेनी यांची दरगाह आहे, मंदीर व दरगाह जवळ असुन देखील आजपर्यंत त्यांच्यात कधी धार्मिक वाद झाला नाही ही हिन्दु मुस्लीम एकतेची साक्ष आहे, या दोन्ही संस्था मार्फत राम रहिम मित्र मन्डळची स्थापना करण्यात आली असुन हे मंडळ धार्मिक नाही तर सामाजिक काम करीत असतात, चला मग आपण नवश्या गणपतीचे दर्शनाला जाऊ या

anews Banner

Leave A Comment