• Home
  • 🛑 दिव्यांग महिलांनी साकारला लालबागच्या राजाचा मोझॅक पोट्रेट ! 🛑

🛑 दिव्यांग महिलांनी साकारला लालबागच्या राजाचा मोझॅक पोट्रेट ! 🛑

🛑 दिव्यांग महिलांनी साकारला लालबागच्या राजाचा मोझॅक पोट्रेट ! 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 23 ऑगस्ट : ⭕ गणेशोत्सवाला देशभरात उत्साहात सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. या आवाहनानुसार बोरीवलीतल्या कलाकार श्रुतिका शिर्के- घाग यांनी दिव्यांग महिलांच्या मदतीने 36000 कागदी फुलाचा वापर करून लालबागच्या राजाचा मोझॅक पोट्रेट साकारला. हा पोट्रेट पाहून साक्षात लालबागच्या राजाचे दर्शन झाल्याची अनुभूती येते.

अस्मिता संस्थेतील दिव्यांग महिला व कलाकार श्रुतिका शिर्के- घाग यांनी 8 बाय 10 फुटाची लालबागच्या राजाची कलाकृती साकारली. यामध्ये तब्बल 36000 कागदी फुलाचा वापर करण्यात आलाय. तर ६ विविध रंगछटांचा वापर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ही कलाकृती साकारण्या मागे शिला पगारे, किशोरी मल्हार, ज्योत्स्ना पटेल, सोनल मोकानी, किरण मुळम या दिव्यांग महिलांना कला अवगत करण्याचा मानस होता. या कलेद्वारे त्यांना आपल्या पुढील आयुष्यासाठी मदत होईल. तसेच ही कलाकृती साकारण्यासाठी विविध क्षेत्रातील एकूण १३ कलाकारांचा सहभाग होता. या सर्व कलाकृती साकारण्यासाठी 10 जागतिक विक्रम धारक चेतन राऊत याने मार्गदर्शन केले. हि प्रतिकृती साकार करण्यासाठी त्रिभुवन धुरिया फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेने आर्थिक सहकार्य केले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment