• Home
  • 🛑 सरकारने घेतला निर्णय ; विमान प्रवास करण्यापूर्वी हे वाचा! 🛑

🛑 सरकारने घेतला निर्णय ; विमान प्रवास करण्यापूर्वी हे वाचा! 🛑

🛑 सरकारने घेतला निर्णय ; विमान प्रवास करण्यापूर्वी हे वाचा! 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 23 ऑगस्ट : ⭕ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सप्टेंबरपासून एव्हिएश सिक्युरिटी फी (सुरक्षा शुल्क) वाढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास किंचित महागणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी केंद्र सरकारने सुरक्षा शुल्कात वाढ केली आहे.

विमान कंपन्यांकडून तिकिटात सुरक्षा शुल्क वसूल केले जाते. त्यानंतर ते केंद्र सरकारकडे जमा केले जाते. विमानतळावरील सुरक्षेसाठी हा निधी खर्च केला जातो. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाकडून सुरक्षा शुल्क घेतले जाते. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने पुढील महिन्यापासून सुरक्षा शुल्क वाढवण्याचे निर्देश कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार विमान कंपन्यांकडून सप्टेंबरपासून शुल्क वाढ लागू केली जाणार आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानुसार सप्टेंबरपासून एव्हिएशन सिक्युरिटी शुल्क देशांतर्गत प्रवाशांसाठी १५० रुपयांवरून १६० रुपये होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हे शुल्क ४.८५ डॉलरवरून ५.२ डॉलर होणार आहे. गेल्या वर्षी ७ जून २०१९ रोजी केंद्र सरकारने एव्हिएश सिक्युरिटी फी (सुरक्षा शुल्क) १३० रुपयांवरून १५० रुपये केले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हे शुल्क ३.२५ डॉलरवरून ४.८५ डॉलर केले होते.⭕

anews Banner

Leave A Comment