• Home
  • 🛑 लवकरच येतोय IPO; या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 🛑

🛑 लवकरच येतोय IPO; या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 🛑

🛑 लवकरच येतोय IPO; या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 23 ऑगस्ट : ⭕ भारतीय जीवन विमा कंपनी (Life Insurance Corporation of India) प्रत्येक वर्षी ४ लाख कोटी रुपयांचा प्रिमियम गोळा करतो. तर कॅनडाच्या जीवन विमा क्षेत्रात ३.७० कोटी रुपये इतका प्रिमियम गोळा होतो. LIC साठी काम करणाऱ्या एजंटची संख्या मॉरिशसच्या एकूण लोकसंख्ये एवढी आहे. यावरून तुम्हीच अंदाज लावू शकता की, एलआयचीचा कारभार किती मोठा असेल. LIC अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, या वर्षी त्यांचा आयपीओ येणार आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल…

विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली LIC या वर्षी शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी करत आहे. LIC या आर्थिक वर्षात IOP आणणार आहे. जर या वर्षी LICने आयपीओ बाजार आणला तर तो येणाऱ्या काळातील सर्वात मोठा आयपीओ ठरेल. त्याच्या जवळ फक्त जिओ आणि रिलायन्स रिटेल हेच आयपीओ जाऊ शकतील. अशामुळे सर्वांची नजर आहे ती LICच्या आयपीओवर…

भारतात कोणत्याही ठिकाणी गेला तरी तुम्हाला LICचा प्रतिनिधी दिसेल. मेट्रो शहरापासून ते छोट्या गावात LICचा एजेंट असतो. LICच्या प्रतिनिधींची संख्या १२ लाख इतकी आहे. जी मॉरिशसच्या लोकसंख्ये इतकी आहे.

LIC ग्राहकांकडून जो विम्याचा हप्ता घेते तो अगदी काळजीपूर्वक आणि हुशारीने गुंतवला जातो. त्यामुळेच LICला सर्वात मोठा गुंतवणूकदार मानले जाते देशातील म्यूचल फंडमध्ये ४५ कंपन्यांचे जितके Asset Under Management आहे इतके एकट्या LICचे आहे. त्यांची गुंतवणूक २९ लाख १९ हजार ४७८ कोटी इतकी आहे. तर ४५ कंपन्यांची मिळून २७.२८ कोटी इतकी आहे.⭕

anews Banner

Leave A Comment