Home Breaking News 🛑 गॅसचा वापर न करता बाप्पासाठी तयार करा लाडू 🛑

🛑 गॅसचा वापर न करता बाप्पासाठी तयार करा लाडू 🛑

140
0

🛑 गॅसचा वापर न करता बाप्पासाठी तयार करा लाडू 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

✍️ पाककृती :-

मुंबई, 23 ऑगस्ट : ⭕ घरात बाप्पाचे आगमन झाले की खूप घाई गडबड असते. त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट काय करायचे हे सुचत नाही. म्हणून तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी गॅस न वापरता पान लाडू तयार करू शकता. पान लाडू तयार करण्यासाठी जास्त वेळ देखील जात आहे. तर मग जाणून घ्या झटपट पान लाडू कसे तयार करतात.

➡️ साहित्य :-

सुक्का मेवा, गुलकंद, डेसिकेटेड कोकोनट, बडीशेप, धनाडाळा, तुटीफ्रुटी, वेलची पुड, जायफळ, चेरी.

➡️ कृती :-

पहिल्यांदा एका वाटीत सुका मेवा, गुलकंद, डेसिकेटेड कोकोनट, १ चमचा बडीशेप, धनाडाळ, १ चमचा तुटीफ्रुटी, पाव चमचा वेलची पुड आणि त्यानंतर किसलेले जायफळ दोन चिमुटभर घालायचं. त्यानंतर हे सर्व मिश्रण मिसळून घ्यायचे. मग यानंतर आणखी एक भांड घ्यायचं त्यात डेसिकेटेड कोकोनट घ्यायचे. मग त्यामध्ये १/२ मिल्क पावडर टाकायची. त्यानंतर एक चमचा तुप आणि पाव कप खस सिरप घालायचे. नंतर या मिश्रणाचा गोळा घेऊन त्यात केलेले सुक्या मेवाचे मिश्रण त्यात घालून पुन्हा लाडू सारखा गोळा करून घ्यायचा. मग त्यावर चेरी लावायची. अशा प्रकारेतुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट पान लाडू करू शकता.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here