• Home
  • 🛑 मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे आगमन 🛑 ✍️ मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे आगमन 🛑 ✍️ मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे आगमन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ आज श्री गणेश चतुर्थी सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत असून गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर .श्री गणरायाचे आगमन झाले आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.

वर्षा बंगल्यावर गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर आरती सुद्धा झाली. मुख्यमंत्री कार्यालयाने एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री आपल्या परिवारासोबत आरती करत असल्याचं पहायला मिळत आहे.
गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!’

श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

⭕नियम पाळा, गाफीलपणा नको⭕

संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे....⭕

anews Banner

Leave A Comment