Home नांदेड अटक होणं सोपं नसतं, पैसे खाल्ल्यानंतर अटक टाळण्यासाठी पक्ष बदलावा लागतो –...

अटक होणं सोपं नसतं, पैसे खाल्ल्यानंतर अटक टाळण्यासाठी पक्ष बदलावा लागतो – राष्ट्रवादि काॅं.महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर

131
0

राजेंद्र पाटील राऊत

‘अटक होणं सोपं नसतं, पैसे खाल्ल्यानंतर अटक टाळण्यासाठी पक्ष बदलावा लागतो – राष्ट्रवादि काॅं.महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर

राजेश एन भांगे /युवा मराठा न्युज नेटवर्क

रेमडेसिविर इंजेक्शनच पुरवठा करण्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली.

हे समजताच रात्री उशिरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक वादावादी देखील झाली होती. हे सर्व समोर येताच भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सोबत उपस्थित असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून पोलिसांवर दबाव निर्माण करून एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक पाहता, गुन्हा करणारा जितका दोषी असतो तितकाच दोषी गुन्हेगाराला पाठीशी घालणारा असतो. दोन्ही आरोपींना एकच शिक्षा असते, त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिल्याबद्धल पोलीसांनी फडणवीस आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून अटक करावी.’
अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

चाकणकर यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?

रेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी साहेबांशी बोलणं झालेलं
माहिती तर घ्यायची.
आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे अशा शब्दात अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

आता चित्रा वाघ यांच्या टीकेचा रुपाली चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘बरोबर आहे, अटक होणं सोपं नसतं. अटक होणे म्हणजे काय हे समजण्यासाठी “लाचखोर” असावं लागतं.

“पैसे खाल्ल्यानंतर अटक टाळण्यासाठी पक्ष बदलावा लागतो.
ज्यांनी आपल्याला समाजात मानाचं स्थान दिलं त्यांच्यावर भर सभेत टीका करावी लागते. यासाठी दगडाचं काळीज असावं लागतं.
खरंच, अटक होणं सोपं नसतं’ असा घणाघात चाकणकर यांनी केला आहे.

Previous articleचाकूचा धाक दाखवून मोटरसायकल चालकास लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
Next articleराम रहिम कोव्हीड सेंटर चे उद्घाटन  संकटात धावून येणारा विठ्ठल म्हणजे बंडु काका बच्छाव हभप इंदोरीकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here