• Home
  • आकाश मोरे भारतीय सैन्यात दाखल**

आकाश मोरे भारतीय सैन्यात दाखल**

आकाश मोरे भारतीय सैन्यात दाखल***
(युवराज देवरे दहिवड प्रतिनिधी)
दहिवड गावचे रहिवासी असलेले स्वर्गीय काशिनाथ शिवराम मोरे यांचे नातू आकाश भाऊसाहेब मोरे हे दोन वर्षापासून भरतीची तयारी करत होते आणि आज सगळे निवड प्रक्रिया पूर्ण करून ते भारतीय सैन्यात दाखल झाले.
समाजसेवेचा वारसा लाभलेले मोरे कुटुंब . काशिनाथ शिवराम मोरे एक प्रगतिशील शेतकरी होते .तसेच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर लोकांना मोफत रुग्णसेवा दिली त्यांचा लहान भाऊ बाळू काशिनाथ मोरे हे भारतीय सैन्यात होते.तसेच त्यांचे दोन मुलं भारतीय सैन्यात होते. आणि आज हीच परंपरा राखत त्यांचा नातू हा सुद्धा देशसेवेसाठी भारतीय सैन्यात मराठा बटालियन मध्ये दाखल झाला.
यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता.
सत्कार समारंभामध्ये युवा मराठा न्यूज चे प्रतिनिधी श्री युवराज देवरे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना भेटण्यासाठी असंख्य मित्र मंडळींनी गर्दी केली होती.

anews Banner

Leave A Comment