Home Breaking News 🛑 प्ले स्टोरवरून हटवले Paytm , गुगलची मोठी कारवाई 🛑

🛑 प्ले स्टोरवरून हटवले Paytm , गुगलची मोठी कारवाई 🛑

87
0

🛑 प्ले स्टोरवरून हटवले Paytm , गुगलची मोठी कारवाई 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 19 सप्टेंबर : ⭕ Google ने आज गुगल प्ले स्टोर वरुन पेटीएम अॅप हटवले आहे. हे अॅप कशामुळे हटवले याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोरच्या नियमांचं वारंवार उल्लंघन करत असल्याच्या कारणावरून पेटीएमवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Paytm आणि UPI अॅप One97 Communication Ltdने डेव्हलप केलेला आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोरवर सर्च केल्यानंतर ते अॅप आता या ठिकाणी दिसत नाही. परंतु, ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये आधीपासून हे अॅप आहे ते सध्या काम करीत आहे. पेटीएम अॅप शिवाय कंपीनीचे अन्य अॅप्स Paytm for business, Paytm money, Paytm mall आदी गुगल प्ले स्टोरवर अद्याप उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोरमधून हटवल्यानंतर पेटीएमकडून यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही.

गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ऑनलाइन कॅसिनोची परवानगी गुगल देत नाही. आम्ही अशा कोणत्याच अॅपला परवानगी देत नाही. जो ग्राहकांना अन्य दुसऱ्या वेबसाइटवर घेऊन जातो.

असे करणे हे गुगल नितीचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही अशा अॅप्सवर कारवाई करीत असल्याचे गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here