Home Breaking News 🛑 *कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ...

🛑 *कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?* 🛑

99
0

🛑 *कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?* 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 19 सप्टेंबर : ⭕ कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ म्हणजेच घरात विलगीकरण करून घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यानुसार 14 सप्टेंबरला राज्यात 17,12,160 जण होम क्वारंटाईन होते.

मुंबईतल्या कोव्हिड बाधित रुग्णांमध्ये 50 ते 60 वर्षाच्या वयोगटातलं मृत्यूंचं प्रमाण इतर वयोगटांपेक्षा जास्त आढळलंय. यामुळेच होम क्वारंटाईनसाठीच्या सुरुवातीच्या सूचनांमध्ये मुंबई महापालिकेने बदल केले.

50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांना जर इतर दीर्घकालीन स्वरूपाचे आजार असतील तर त्यांनी होम क्वारंटाईनचा आग्रह धरू नये असं मुंबई महापालिकेने म्हटलंय. या रुग्णांना कोरोना काळजी केंद्र-२ किंवा समर्पित कोरोना आरोग्य अथवा शासकीय किंवा खासगी समर्पित कोरोना रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या गरजेनुसार दाखल करण्यात येईल. याशिवाय लक्षणं नसलेल्या कोव्हिड रुग्णांना दीर्घकालीन आजार नसतील तर त्यांना होम क्वारंटाईनचा पर्याय देण्यात येईल.

होम क्वारंटाईन म्हणजे नक्की काय? आणि होम क्वारंटाईन झाल्यावर काय काळजी घ्यायची? हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेऊयात.

‘क्वारंटाईन’ शब्द आला कुठून?
14व्या शतकात जगात अनेक ठिकाणी प्लेगची साथ होती. या काळात व्हेनिस शहराच्या बंदरात अनेक बोटी जगभरातून दाखल होत. पण या जहाजांमधून 40 दिवस कोणीही बाहेर पडू शकत नसे.

बोटीवरच्या कोणालाही प्लेग किंवा दुसरा संसर्गजन्य आजार नाही, याची खात्री या 40 दिवसांत केली जाई आणि मगच खलाशांना उतरण्याची परवानगी मिळे.

‘क्वारंटिना’ या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ होतो – 40, आणि त्यावरूनच आला शब्द ‘क्वारंटाईन’. हाच शब्द सध्या सतत आपल्या कानावर पडतोय. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन केलं जातंय.

यासाठी सरकारने ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारलेली आहेत. पण यासोबतच आता होम आयसोलेशन किंवा होम क्वारंटाईनचा म्हणजेच घरच्या घरीच अलगीकरण किंवा विलगीकरणाचा पर्याय सरकारने द्यायला सुरुवात केलीय.
कोरोना नियम: होम क्वारंटाईन होताना काय काळजी घ्यायची? । #सोपीगोष्ट 107

पण नेमकं कोणाला घरी क्वारंटाईन किंवा आयसोलेट केलं जातं? हे करताना काय काळजी घ्यायला हवी? जर कोणी होम क्वारंटाईन झालं तर त्यामुळे घरातल्या इतरांना काही धोका आहे का? याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे नेमकं काय?
मराठीत ‘क्वारंटाईन’ला विलगीकरण म्हणतात आणि आयसोलेशनला अलगीकरण म्हणतात. क्वारंटाईन अशा व्यक्तींना केलं जातंय जे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेत आणि ज्यांच्यात सौम्य किंवा अति-सौम्य लक्षणं दिसतायत.

तर ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत, ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळतायत किंवा अजिबात लक्षणं न आढळणाऱ्या म्हणजेच असिम्प्टोमॅटिक रुग्णांना आयसोलेशन म्हणजेच अलगीकरणात ठेवलं जातं.
लोकांना वेगळं का ठेवलं जातं?

त्यांच्यापासून इतर कुणालाही कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, म्हणून या लोकांना वेगळं ठेवलं जातं. हा संसर्गजन्य आजार आहे. बोलताना, शिंकताना, खोकताना उडणाऱ्या सूक्ष्म तुषारांतून तो पसरू शकतो. म्हणूनच या कोव्हिड संशयित किंवा बाधित व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं आहे.

एकीकडे रुग्णांची संख्या वाढत जातेय, पण दुसरीकडे केंद्र सरकारनं क्वारंटाईनचे नियम बदललेत. अति सौम्य लक्षणं आढळणाऱ्या वा लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना जर त्यांच्या घरी आवश्यक त्या सुविधा असतील – म्हणजे वेगळी खोली, स्वतंत्र टॉयलेट तर त्यांच्या घरीच विलगीकरणाचा पर्याय देण्यात येतोय. यासाठी रुग्णाच्या संमतीची गरज असते आणि तुम्हाला एक प्रतिज्ञापत्रं भरून द्यावं लागतं.⭕

Previous article🛑 *हिज हायनेस श्रीमंत महाराजा हेमन्द्रसिंह महाराज पवार बहाद्दूर (संस्थान धार)* 🛑
Next article🛑 प्ले स्टोरवरून हटवले Paytm , गुगलची मोठी कारवाई 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here