• Home
  • 🛑 *हिज हायनेस श्रीमंत महाराजा हेमन्द्रसिंह महाराज पवार बहाद्दूर (संस्थान धार)* 🛑

🛑 *हिज हायनेस श्रीमंत महाराजा हेमन्द्रसिंह महाराज पवार बहाद्दूर (संस्थान धार)* 🛑

🛑 *हिज हायनेस श्रीमंत महाराजा हेमन्द्रसिंह महाराज पवार बहाद्दूर (संस्थान धार)* 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

विशेष बातमी :⭕श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र हि संघटना श्री सागर पवार यांनी आठ वर्षापूर्वी शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून धार पवार बंधु एकत्र करायला सूरवात केली.

आज पावतो आपल्या वेबसाईटवर तीन लाख धार पवार बंधू जोडले गेले आहेत. धार पवार बंधूंच हे कर्तबगार संघटन. ह्या संघटनेच्या विषयी काही माहिती श्रीमंत महाराजा हेमन्द्रसिंह पवार बहाद्दूर यांना मिळली.

महाराजांनी आपल्या संघटनेचे अध्यक्ष व धार पवार बंधु एकत्रिकारणाचे जनक श्री सागर पवार यांना भेटीचे निमंत्रण दिले. श्री सागर पवार श्री रितेश पवार श्री बाबाकाका पवार व उमेश वैद्य (पवार औषधराव) ह्यांनी मध्य प्रदेश ह्या धार येथील त्यांच्या राजवाड्यात भेट घेतली.

खरतर आम्हाला भेटीची वेळ फक्त २० मिनटं होती. पण संघटनेचे कार्य व ऐतिहासीक ह्या विषयात आमची चर्चा चार तास चालली. ह्या भेटीत अस वाटलंच नाही की आम्ही व महाराज पहिल्यांदा भेटलो आहे.

चर्चा आटोपल्यावर महाराजांनी आम्हाला पवार राजघराण्याचे देवघर दाखवलं. ज्यात अनेक जुन्या दुर्मिळ मूर्ती होत्या. स्वतःच्या भोजन कक्षात नेऊन आमच्या सोबत जेवण हि केलं. महाराणी साहेबांनी आदिराथ्य केलं.

पवार राजघरान्याचा राजमुकुट (पगडी) जी अतिशय मौल्यवान कपडा व हिरे यांनी सजली आहे. अतिशय दुर्मिळ व पावन ठेवा महाराज साहेबांनी थेट उमेश रावांच्या हातात आणून दिला. पवार घरण्याच्या राजवैभवच्या सर्वोच्च मांनाचा असणारा हा शिरपेच आम्हाला स्पर्श करायला ह्याच भाग्य आम्हाला महाराज साहेबांच्या मुळे मिळले.

संघटनेचे महत्व व कार्य पाहून हेमन्द्रसिंह महाराज साहेबांनी आम्हाला एक भेट देण्याचे ठरवले. ती भेट म्हणजे धार राजघरान्याचा सिम्बॉल व राजघराणे चा ध्वज अधिकृतपणे वापरण्या साठी त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार आम्हाला परवानगी दिली.

इतकच काय एक संस्थानचा ७० किलो वजनाचा दुर्मिळ पोलादी सिम्बॉल संघटनेला भेट हि दिला. या नंतर महाराज आणि संघटना हे एकजीव झाले. धार इथल्या आपल्या संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमला महाराज साहेब आवर्जून उपस्थित राहतात.

महाराज साहेबांचे संघटनेच्या प्रत्येक कार्याला शुभेच्छा व सहकार्य नेहमीच असते. धार पवार बंधु साठी काही अडचण असल्यास किंवा काहीहि करण्यास मी आपल्या संघटने साठी कायम तत्पर आहे. हा शब्द आपल्या साठी उत्स्फूर्त प्रेरना आहे.

आशा दिलदार व प्रेमळ व्यक्तिमत्त्व असणाऱ्या धार नरेश महाराजा हेमन्द्रसिंह पवार बहाद्दूर यांचा आज वाढदिवस….

महाराज साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन. दीर्घायु व्हा.

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र..⭕

anews Banner

Leave A Comment