• Home
  • 🛑 *भविष्यकाळातील गरज ओळखून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करा* 🛑

🛑 *भविष्यकाळातील गरज ओळखून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करा* 🛑

🛑 *भविष्यकाळातील गरज ओळखून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करा* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕पुणे शहरातील नजीकच्या भविष्यकाळातील गरज ओळखून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करा, अशी सूचना आज विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली. नजिकच्या काळात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार असून याबाबत लवकरात लवकर व्यवस्था करावी अशी सूचना केली असून यात खासगी रुग्णालयांनाही दोन्ही प्रकारचे बेड्स वाढवण्यासंदर्भात सूचना करण्यास सांगितले आहे.

बैठकीत संसर्गाची स्थिती, उपाययोजना आणि नियोजन याबाबत सर्वांगाने सविस्तरपणे चर्चा झाली. यावेळी बैठकीत राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, जमाबंदी आयुक्त श्री. एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते…⭕

anews Banner

Leave A Comment