Home Breaking News 🛑 ‘कर्जत स्वच्छता मिशन ‘अभियानांतर्गत कचऱ्यावरील प्रक्रिया आढावा बैठक 🛑

🛑 ‘कर्जत स्वच्छता मिशन ‘अभियानांतर्गत कचऱ्यावरील प्रक्रिया आढावा बैठक 🛑

124
0

🛑 ‘कर्जत स्वच्छता मिशन ‘अभियानांतर्गत कचऱ्यावरील प्रक्रिया आढावा बैठक 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कर्जत /अहमदनगर :⭕तालुक्यातील काही भागात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना व नियोजनामुळे कुकडी पाणलोट क्षेत्रातील जलसाठे १० वर्षात प्रथमच पूर्ण क्षमतेने भरले. बारडगाव दगडी, कोपर्डी व करमनवाडी येथील तलावांचे स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन केलं. विशेष म्हणजे या वर्षी पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने व मुबलक पाणीसाठा असल्याने या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या बारडगाव दगडीच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे पीक घेतले आहे, या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या शेंगा भेट दिल्या.!

बारडगाव दगडी मधील काही वाड्या वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचा ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ केला. तसेच मिरजगाव मधील प्रस्तावित विकास कामांमुळे गाळे धारकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत विकासकांमांचे नियोजन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला दाम मिळाला पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाची किमान आधारभूत किंमत योजना (२०२०-२१), तसेच नाफेड व मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत कर्जत आणि टाकळी खंडेश्वरी येथे हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन व तूर खरेदी केंद्रांचे उदघाटन केलं. शासकीय हमीभाव केंद्रे सुरू होताच खाजगी केंद्रांनी उडीदाचा ५०० रुपये प्रति क्विंटल दर वाढवला असल्याचे दिसून आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, घरोघरी जावून कोरोना लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात प्रशासकीय अधीकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी कर्जत तालुक्यात आजवर कोरोनाशी लढलेल्या कोरोना वॉरिअर्सना भेटून, शुभेच्छा देवून त्यांचे मनोबल वाढवले.

स्वच्छ भारत व कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘कर्जत स्वच्छता मिशन’अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापन व कचऱ्यावरील प्रक्रिया यासंबंधी नियोजन व आढावा बैठक घेण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत शेवटी असणाऱ्या कर्जतला राजकारण विरहित प्रयत्न करून येत्या ६ महिन्यात टॉप ५ क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार काम पुढे नेण्यासंबंधी सूचना यावेळी दिल्या.

कोरोनामुळे काही प्रमाणात नव्या विकासकामांना ब्रेक लागला असला तरी नियोजित कामे कालबद्ध सुरू आहेत.

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भोसे आणि चांदे बुद्रुक शाळेच्या नव्या खोल्यांचे तर चखालेवाडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन आणि बारडगाव दगडी येथील अंगणवाडीचे लोकार्पण केलं.

कर्जत तालुक्यातीलच भोसे येथील विशाल खराडे यांनी सुरू केलेल्या तुळजाभवानी मोबाईल शॉपीचे तर देविदास क्षीरसागर यांच्या आदित्य कंप्युटर्स तर त्रिमूर्ती पतसंस्थेच्या कुळधरण येथील कार्यालयाचे तसेच दुरगाव येथील जगदंबा पेव्हर ट्रेडर्स या नव्या व्यवसायांचे उदघाटन करून त्यांच्या व्यवसायाला भरभराटी लाभण्यासाठी शुभेच्छा दिल्या….⭕

Previous article🛑 *जादा भाडे आकारणार्‍या रुग्णवाहिकांवर कारवाई*🛑
Next article🛑 *भविष्यकाळातील गरज ओळखून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करा* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here