• Home
  • *तांबडी-रोहा येथील मराठा लेकीला न्याय देण्यासाठी मराठा क्रांती मूक व ठोक मोर्चा एकत्र*

*तांबडी-रोहा येथील मराठा लेकीला न्याय देण्यासाठी मराठा क्रांती मूक व ठोक मोर्चा एकत्र*

*तांबडी-रोहा येथील मराठा लेकीला न्याय देण्यासाठी मराठा क्रांती मूक व ठोक मोर्चा एकत्र*
तांबडी,(विजय पवार महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
दि. १६ ऑगस्ट २०२०, आज महाराष्ट्राच्या सोलापूर, पुणे, संभाजीनगर, वसई, मुंबई, ठाणे, रायगड, नगर अशा विविध जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चातील महत्वाचे राज्य समन्वयक तांबडी-रोहा येथे पोहोचले. नराधमांच्या क्रौर्याला बळी पडलेल्या अल्पवयीन मराठा लेकीला न्याय देण्यासाठी मराठा क्रांती ठोक व मूक मोर्चा समन्वयक सदर मराठा म्हांदळेकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तांबडी गावात पोहोचले.

याआधी रक्षाबंधनाच्या दिवशी आपले घरचे रक्षाबंधन सोडून यापैकी काही समन्वयक आपल्या मराठा बहिणीसाठी, तिला न्याय मिळावा यासाठी धावून गेले होते. त्यावेळी रोहा पोलीस स्टेशनला निवेदनही देण्यात आले होते.

मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक श्री राजन जी घाग व इतर सहकारी यांनी सदरच्या घटनेचे मूळ तपास अधिकारी श्री सूर्यवंशी यांनी पुनर्नियुक्ती करावी, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे व सरकारी अभिवक्ता म्हणून श्री उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती करावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांजकडे केली होती. सबब संबंधित पोलीस ठाण्याला भेट देऊन सर्व मराठा समन्वयकांनी तपासातील प्रगतीही जाणून घेतली.

तांबडी गावात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्री राजनजी घाग, श्री रमेश केरे पाटील, श्री प्रफुल्ल पवार, श्री रुपेश मांजरेकर, श्री विवेक सावंत, श्री विलास सुद्रीक, श्री महेश राणे, श्री युवराज सूर्यवंशी, श्री महेश डोंगरे, श्री उल्हास सूर्यवंशी,श्री महेश यादव, श्री प्रकाश कदम, श्री भागवत पानसरे, आदी व सौ छाया इंदुलकर, सौ रुपाली निंबाळकर आणि इतर भगिनी असे अनेक समन्वयक पूर्ण महाराष्ट्र राज्यातून म्हांदळेकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. यावेळी तांबडी गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रोहा, नागोठणा येथील अनेक मराठा समन्वयकही उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment