• Home
  • *पार्थ पवारांना भाजपमध्ये घेणार नाही, गिरीश बापट*

*पार्थ पवारांना भाजपमध्ये घेणार नाही, गिरीश बापट*

*पार्थ पवारांना भाजपमध्ये घेणार नाही, गिरीश बापट*

*कोल्हापूर( मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज )*

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारल्यानंतर, पार्थ पवार वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगू लागली होती. पार्थ भाजपची वाट निवडणार का, असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात होता. मात्र, या चर्चा भाजप खासदार गिरीश बापट यांनी फेटाळल्या आहेत.
पार्थ पवार भाजपमध्ये येणार नाही आणि आम्ही त्याला घेणार ही नाही. असं भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले.
पार्थ पवारांबाबतचा प्रश्न हा पवार कुटुंबाचा प्रश्न आहे. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांचा त्यांनी कुटुंबात सोडवावा,” असंही गिरीश बापट म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केल्याबद्दल शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, “पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या मताला कवडीची किंमत देत नाही,” असं ते म्हणाले होते.

anews Banner

Leave A Comment