• Home
  • *कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुन्हा* *पुराची शक्यता*

*कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुन्हा* *पुराची शक्यता*

*कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुन्हा* *पुराची शक्यता*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यातील धरण क्षेत्रात तुफान पाऊस सुरू आहे. या जिह्यातील सर्व धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे पृष्णा, कोयना, पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे.
हा पाऊस असाच सुरू राहिल्यास पुन्हा एका पुराचे संकट असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरास सुरूवात केली आहे.
कोल्हापुरातील राधानगरीसह वारणा, दूधगंगा या धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत पंचगंगेच्या पाणीपातळीत पाच ते सहा फुटांनी वाढ झाली असून, राजाराम बंधाऱयाची पाणीपातळी 33 फूट 7 इंच इतकी झाली आहे. सांगली जिह्यातील चांदोली आणि साताऱयातील कोयना धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेचे सहा वक्र दरवाजातून कोयना नदीत विसर्ग सुरू आहे. यामुळे साताऱयासह सांगलीत पुराचा धोका निर्माण झाला आहे. सांगलीत पृष्णा नदीची पाणीपातळी झपाटय़ाने वाढत असून, आता ती आयर्विन पुलाजवळ 28 फुटांवर पोहोचली आहे.
सांगली, कोल्हापुरातील नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे. सांगलीत पृष्णेची पातळी 29 फुटांवर गेल्यानंतर नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे, जे नागरिक स्थलांतर करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.

anews Banner

Leave A Comment