• Home
  • *राधानगरी तालुक्यात मुसळधार* *पाऊस*

*राधानगरी तालुक्यात मुसळधार* *पाऊस*

*राधानगरी तालुक्यात मुसळधार* *पाऊस*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे 13 ऑगस्ट रोजी बंद झाले होते. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने 3, 4, 5, 6 असे चार राधानगरी धरणाचे पुन्हा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे. दरवाज्यांमधून आत्ता 5712 क्युसेस व 1400 क्युसेस बीओटी पावर हाउस मधून असे मिळून एकूण 7112 क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 141 मिलिमीटर पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झाला आहे. आत्तापर्यंत राधानगरी तालुक्यात 3538 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
तर शिरगाव बंधारा हा पाण्याखाली गेला असून राधानगरी पिरळ मार्गे कोल्हापूरला जाणारा पिरळ पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाणाऱ्यांचा संपर्क बंद झाला आहे.
तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

anews Banner

Leave A Comment