• Home
  • *डोळ्याचे पारणे फेडणारे,अप्रतीम कलाकृतीने नटलेले दहीवडचे निसर्ग सौंदर्य ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणुन घोषित करा अशी दहीवड ग्रामवासियांची मागणी:*

*डोळ्याचे पारणे फेडणारे,अप्रतीम कलाकृतीने नटलेले दहीवडचे निसर्ग सौंदर्य ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणुन घोषित करा अशी दहीवड ग्रामवासियांची मागणी:*

*डोळ्याचे पारणे फेडणारे,अप्रतीम कलाकृतीने नटलेले दहीवडचे निसर्ग सौंदर्य ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणुन घोषित करा अशी दहीवड ग्रामवासियांची मागणी:*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

सद्या दहीवड गावातील भौरी परीसरात असणारे (चोरचावडी ) येथील परसुल नदीवर असणारा धबधबा हा खूपच लोकप्रिय ठरला आहे,या ठिकाणि रोज पर्यटन येऊन आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारे,अप्रतीम कलाकृतीने नटलेले निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून घेत आहेत.
याच प्रमाणे दहीवड गावात अजून अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

१) देवळा तालुक्याच नव्हे तर संपुर्ण नाशिक जिल्ह्यात ऐकमेव मंदिरांचे गांव म्हणुन दहिवड प्रसिद्ध आहे.
२) गांवाला चहुबाजुने उंच उंच डोंगरांनी वेढलेले आहे.निसर्गाची एक अप्रतिम कलाकॄती म्हणजेच दहिवड.
३) संत तुकाराम महाराज मंदिर भंडा-या डोंगर
४) निसर्गरम्य ब्रिटीश कालीन परसुल धरण, ब्राम्हणबुडी परीसर.
५) आई माऊली परिसर व ओबारा धरण
६) निसर्ग सानिध्यातील सौर उर्जा प्रकल्प.
७) धार्मिकतत्व देवदारेश्वर.
८) दागड्या डोंगर संत जनार्दन स्वामी कुटीया परीसर.
ही सदर ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणुन घोषित करावे अशी दहीवड ग्रामवासीयांची शासनाकडे मागणी आहे.

anews Banner

Leave A Comment