Home Breaking News 🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

165
0

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी /मालगुंड :⭕
*मित्रांनो कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळी वर काम करत आहे.अशावेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.*

*छावा प्रतिष्ठान रत्नागिचे अध्यक्ष श्री.सुनिल अनंत धावडे आणि उपाध्यक्ष श्री.सुनिल आग्रेसाहेब यांच्या संकल्पनेतून छावा प्रतिष्ठान स्थापन झाले असून समाजातील गरजूं लोकांना मदत करण्याचे काम प्रतिष्ठान करते.याच भावनेतून आगामी काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन छावा प्रतिष्ठान ने या “रक्तदान शिबिराचे” आयोजन केले असून या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचेही पालन केले जाणार आहे.*

*१८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० ते ०२ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र,मालगुंड येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे.त्यामुळे इच्छुकांनी आपली नावे श्री.मुकेश धावडे -८६०५६६६०६४, श्री.केशव शिवगण – ८२९१५३९९४४ यांच्या नंबर वर कळवावी असे आवाहन छावा प्रतिष्ठान रत्नागिरीकडून करण्यात येत आहे.*

*श्री.नितीन सूर्यकांत रोडे*
*(मीडिया प्रमुख – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी)* ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here