युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे पुणे 9 जुलै पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ काश्मीरमध्ये विराजमान जवानांनी केली प्रतिष्ठापना जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टर मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना बुधवारी करण्यात आली आहे काश्मीरमधील 6 मराठा बटालियन मधील मराठी जवानांच्या कुटुंबांनी संकष्टी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीची प्रतिकृती असलेली मूर्ती स्थापन केली. काश्मीरच्या गुरेज सेक्टर मध्ये कंजलवान या गावी मंदिर बांधण्यात आल आहे यासाठी दगडूशेठ मंदिर ट्रस्ट कडे गणपतीची प्रतिकृती मूर्ती द्यावी अशी मागणी मराठा बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी केली होती त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी 36 इंच आची मूर्ती काश्मीर ला पाठवली मुख्य म्हणजे मूर्तीकाराने ही मूर्ती ती बारा दिवसात घडवली ही मूर्ती पुण्याचे तरुण शिल्पकार विपुल खटावकर यांनी घडवली कर्नल विनोद पाटील यांनी दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट ला पत्र पाठवून प्रतिकृती मूर्तीची मागणी केली विनोद पाटील यांनी सांगितले की मंदिर उभारणीसाठी सर्व जवानांनी योगदान दिले मंदिर बांधण्याच्या कामाला सुरुवात केली तेव्हा त्या जागेवर चार ते पाच फूट बर्फ होता नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान हा बर्फ 12 फुटापर्यंत वाढत गेला मात्र जवान थांबले नाहीत चीड या झाडाचा उपयोग जवानांनी हे मंदिर उभारले बुधवारी संकष्टी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली
