Home Breaking News 🛑 *पोलिस आयुक्तांचे वक्तव्य चुकीचे : अजित पवार* 🛑

🛑 *पोलिस आयुक्तांचे वक्तव्य चुकीचे : अजित पवार* 🛑

149
0

🛑 *पोलिस आयुक्तांचे वक्तव्य चुकीचे : अजित पवार* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕कोरोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यातूनच गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत, अशा प्रकारचे वक्तव्य कायदा सुव्यवस्था राखणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांनी करणे चुकीचे असल्याचे मत पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्यात वाढलेल्या गुन्ह्यांमागे लॉकडाऊनमुळे आलेली बेरोजगारी व कारागृहातून पॅरोलवर सुटलेले गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत व्यक्त केले होते. यासंदर्भात पवार यांनी प्रतिक्रीया दिली.

तसेच जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव आणि त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेले व्यवस्थापन याबाबतच्या आढावा बैठकीत पवार बोलत होते. राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीश बापट, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार, नगरसेवक आणि अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवावा. नागरिकांकडून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता यांचा वापर होतो की नाही यावर लक्ष ठेऊन कार्यवाही करावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन पवार यांनी केले.
लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करा
कोरोनाबाधितांवर उपचार करताना सुविधांची उणीव भासत आहे.

त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींकडून विविध सूचना करण्यात येत असतानाही प्रशासकीय पातळीवर या सूचना गांभिर्याने घेतल्या जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु, कोरोना काळात सर्व सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे?आदेश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत….⭕

Previous article🛑 सर्व शरीराच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे गुळ….! जाणून घ्या फायदे 🛑
Next article🛑 साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here