• Home
  • 🛑 सर्व शरीराच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे गुळ….! जाणून घ्या फायदे 🛑

🛑 सर्व शरीराच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे गुळ….! जाणून घ्या फायदे 🛑

🛑 सर्व शरीराच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे गुळ….! जाणून घ्या फायदे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

महाराष्ट्रात उसाचे उत्पादन सर्वात जास्त केले जाते. आणि उसापासून बनवला जातो गूळ. गूळ हा कोणत्याही स्वयंपाक घरात नेहमी आढळतो. एवढे
च काय तर देवाच्या मंदिरातही खोबरे आणि गुळाचा प्रसाद दिला जातो. गूळ हा जेवणात न्याहारीचा प्रकार म्हणून खाल्ला जातो. भारताच्या निर्यात यादीत पाहिले स्थान पटकवणारा गूळ आहे.

नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. गूळ आपल्या पाचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते.

हिवाळ्यात गूळ जरूर खावा. कारण त्यावेळी आपली पचनक्रिया मंदावलेली असते. पण गूळ खाल्ल्याने ती सुरळीत होते.

बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गूळ रामबाण उपाय आहे. साखर तर आधुनिक प्रकार आहे आणि तिच्यामुळे आरोग्याला धोका आहे. मात्र गुळात नैसर्गिकता जास्त आहे.

गुळामुळे स्नायु बळकट होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते. तसेच गुळामुळे थकवा जाणवत नाही. गूळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या हाडे दुखीपासून अराम मिळू शकतो. दूध आणि गूळ हा एक उत्तम पर्याय आहे. गुळात भरपूर प्रमाणात खनिज आहे.

गुळात असलेल्या पोटॅशियममुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शरीराची पाणी वाचवून ठेवण्याची क्षमता गुळामुळे कमी होते आणि आपले वजन कमी होते. साधारण सर्दी खोकला झाल्याने गुळाच्या चहाने लगेच अराम मिळतो. सुंदर लांब केसांसाठी स्त्रियांनी गुळाचे सेवन अवश्य करावे.

गुळाचे सेवन केल्याने त्वचाही उजळते. तसेच अंगावरील पुरळ, डाग नष्ट करण्यासाठी गूळ मदत करतो. पण रसायनमुक्त आणि नैसर्गिक गूळच घ्यावा. पण जर आपल्याला मधुमेह किंवा अन्य आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाचे सेवन करा…⭕

anews Banner

Leave A Comment