Home विदर्भ पिक विम्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा अधिकारी कार्यालय धडक.

पिक विम्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा अधिकारी कार्यालय धडक.

203
0

राजेंद्र पाटील राऊत

पिक विम्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा अधिकारी कार्यालय धडक.
प्रतिनिधि :- स्वप्निल देशमुख युवा मराठा न्युज नेटवर्क बुलढाणा
मा. विठ्ठलभाऊ लोखांडकार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मदणराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात दिनांक १० ऑगास्ट रोजी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पिक विमा मिळावा या मागणी साठी.महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा बुलडाणा च्या वतीने आंदोलन करण्यात आले. व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्यात आला. सदर मागणी चे आंदोलन नंतर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. व जर लवकरात लवकर पिक विमा मिळाला नाही .तर मनसेच्या वतीने पिक विमा कंपन्यांचे कार्यालये फोडण्याच्या इशारा देण्यात आला..जर शेतकऱ्याच्या हक्क मारण्याचं प्रयत्न सरकारने केला.तर मनसे रस्त्यावर उतरेल.व मनसे स्टाईल ने आंदोलन करेल.होणाऱ्या परिणामाना सर्वस्वी शासन जबाबदार राहील.शेवटी कितीही गुन्हे अंगावर झाले तर ते घेण्यास महाराष्ट्र सैनिक तत्पर आहे.असा संदेश मदनराजे गायकवाड यांनी दिला.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले,तालुका उपाध्यक्ष कांडेलकर,उपाध्यक्ष राजू काळे,शहर अध्यक्ष सागर जगदाळे,उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश अरुण सपकाळ,अजय बेलोकार,बाळराजे देशमुख,गजानन टेकाळे राजू मांटे दीपक जाधव,पंकज पाटील,नांदुरा विभाग अध्यक्ष दुर्गेश बारगजे,विशाल बग्गन,धनंजय देशमुख,अंकित अवचार, मनोज पवार, अजिंक्यदादा मदनराजे गायकवाड, तसेच जिल्हा मधील तमाम मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleविमाकंपनीला पावसाअभावी झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्या – शिवशंकर पा.कलंबरकर.
Next articleभाजपा, अनूसूचित आघाडीवर ज्ञानदेव भारसाकडे, पांडुरंग इंगळे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here