Home विदर्भ गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे बायको नखऱ्याची या तीन अंकी नाटकाचे ७ नोव्हेंबरला...

गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे बायको नखऱ्याची या तीन अंकी नाटकाचे ७ नोव्हेंबरला आयोजन

202

आशाताई बच्छाव

1002148054.jpg

गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे बायको नखऱ्याची या तीन अंकी नाटकाचे ७ नोव्हेंबरला आयोजन

संजीव भांबोरे
गोंदिया -गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे मंडई निमित्त नवयुवक एकता नाट्य मंडळ च्या वतीने ७ नोव्हेंबर 2025 ला रोज शुक्रवारला रात्री ९ वाजता बायको नखऱ्याची या तीन अंकी नाट्य प्रयोगाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमरगावच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले आहे . या तीन अंकी नाटिकेचे नाद ओंकार नाट्यकला रंगभूमी साकोली वडसा येथील कलाकार सादरीकरण करणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याला गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे, माजी मंत्री तथा विद्यमानआमदार राजकुमार बडोले,माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, जी .डी .सी .सी .बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, भाजप नेते नीलम हलमारे , भाजप नेते आनंद चंद्रिकापुरे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मा. गणेश भाऊ पारधी ,उपाध्यक्ष मुन्नालाल दमाहे , सचिव देवेंद्र(बंटी) कटरे ,कोषाध्यक्ष चेतलाल नागपुरे, मंच संचालक देवेंद्र(बंटी )रहांगडाले, संजय दमाहे, सहसचिव टीकेश टेंभरे इतर सदस्यगन यांनी केलेले आहे.