Home नांदेड मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक.

मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक.

111
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0044.jpg

.
मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वा बीडला राम कृष्ण हाॅटेलमध्ये आपल्या संघटनेच्या राज्य कार्यकारी मंडळ व जिल्हाध्यक्षांची बैठक संघटनेचे अध्यक्ष विश्वास खतीब यांचे अध्यक्षतेखाली व सुनिलराव क्षीरसागर सल्लागार यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या सभेला औरंगाबाद,जालना, नांदेड, लातुर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नासिक, बुलडाणा, अमरावती, वाशिम आदी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व राज्याचे सरचिटणीस तुकाराम मोरे, उपाध्यक्ष अंबादास सहाणे, साजेद शेख, सहसचिव विश्वास दंदे, गणेश इनामदार, कोषाध्यक्ष कल्याण बावणे आदींची उपस्थिती होती. संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष डी के जाधव यांनी उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले.
बैठकीच्या प्रारंभी नासिक जिल्हाध्यक्ष विकारतात्या शेख यांनी संघटनेचे सल्लागार सुनिलराव क्षीरसागर, अध्यक्ष विश्वास खतीब,सरचिटणीस तुकाराम मोरे, सहसचिव विश्वास दंदे यांचा सत्कार केला व नासिक जिल्हा परिषदेने ४० हजेरी सहाय्यकांची १/१०/१९८८ पासून मागील सेवा गृहीत धरुन फरकासह सेवानिवृत्ती मंजूर केलेली संचिका संघटनेला सादर करुन विस्तारीत मनोगत व्यक्त केले.*
संघटनेचे सरचिटणिस तुकाराम मोरे यांनी मागील सभेचे प्रोसिडींग व संघटनेच्या जमा खर्चाच्या अहवालाचे वाचन केले त्यास सर्वानी मान्यता दिली. यावेळी विश्वास खतीब, सुनिलराव क्षीरसागर, तुकाराम मोरे, विश्वास दंदे यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या सद्यस्थितीबाबत प्रत्यक्ष वकिलाच्या भेटीचा आढावा दिला व पुढील न्यायालयीन व शासकीय पातळीवरील लढ्याची दिशा संघटनेची पुढील वाटचाल याविषयी मनोगत व्यक्त करुन दि ११ ऑगस्ट २०२२ रोजी ॲड. आनंद ग्रोवर व ॲड आस्था शर्मा यांच्या भेटीचा वृतांत मांडला.*
बैठकीस ऑन रेकॉर्ड वकील ॲड. आस्था शर्मा यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. त्यांनी व्हिडीओ कॉफरन्सद्वारे सर्वोच्च न्यायालयातील सुरु असलेल्या केसच्या सुनावणीबाबत आजपर्यंत केलेल्या व सुरु असलेल्या प्रयत्नांचा तपशील सांगितला व उपस्थितांच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देवून शंका-कुशंकांचे निरसन केले. तसेच न्यायालय व केसच्या सद्यस्थिती व भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. आपल्या संघटनेच्या केसमध्ये नविन नोंदणी झालेल्या सभासदांना समाविष्ट करण्यासाठीची प्रक्रियेची माहिती दिली, तसेच काॅप्युटर जनरेट तारखेला खात्रीने सुनावणी होत नाही, सुनावणी होण्यासाठी केसचा अँडव्हान्स लिस्ट मध्ये समावेश आवश्यक आहे तरच केस न्यायालयात चालते. दि २६ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा. एन व्ही रमण्णा सेवानिवृत्त होत आहेत त्यानंतर येणारे न्यायमूर्ती मा. उदय लळीत सुध्दा ४५ दिवसानंतर सेवानिवृत्त होणार आहेत व पुढील दोन महिन्यात दसरा, दिवाळी सणाच्या सुट्या आहेत तरी सुध्दा सुनावणी होण्यासाठी न्यायालयातील प्रबंधकाकडे सातत्याने विशेष प्रयत्न करण्यात येतील असे ॲड. शर्मा यांनी आश्वासित केले. उपस्थित सर्वानी उभे राहून ॲड. आस्था शर्मा यांचे आभार व्यक्त केले. बैठकीस विकारतात्या शेख नासिक,एन डी धायगुडे सातारा, अशोक चौधरी सोलापूर, अर्जुन कोळी उस्मानाबाद, आर व्ही देशपांडे औरंगाबाद, बाळासाहेब कोरे नांदेड हे जिल्हाध्यक्ष उपस्थितीत होते.
शेवटी संघटनेचे राज्य सहसचिव गणेश इनामदार यांनी बैठकीस उपस्थित असलेल्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here