Home बुलढाणा ग्रामसेवक वर कारवाई न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषण करणार! काकनवाडा बुद्रुक...

ग्रामसेवक वर कारवाई न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषण करणार! काकनवाडा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव यांचा इशारा..

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0016.jpg

ग्रामसेवक वर कारवाई न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषण करणार!
काकनवाडा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव यांचा इशारा..

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा बुद्रुक येथील ग्रामपंचायत मध्ये केलेल्या खर्चात लाखोंची अनियमितता गट विकास अधिकाऱ्यांची ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावल्या नंतर सुद्धा आज पाच महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा संबंधित ग्रामसेवकावर कुठल्याही प्रकारचे कारवाई पंचायत समिती स्तरावरून न झाल्याने आज ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव यांनी गट विकास अधिकारी संग्रामपूर यांना निवेदन देऊन सदर ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास 29 ऑगस्ट 2022 रोजी पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मी आज पाच महिन्यापासून सतत ग्रामपंचायत काकणवाडा बुद्रुक यांच्या खातीनिहाय चौकशी करावी यासाठी वेळोवेळी पंचायत समितीला अर्ज दिले त्यानंतर पंचायत समितीने चौकशी केली परंतु संबंधित ग्रामसेवकावर कुठल्याही प्रकारची कारवाई वादग्रस्त गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी केली नसल्याने 29 ऑगस्ट रोजी काकांनोळा बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव हे पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार आहे. परंतु तालुक्यातील वरवट खंडेराव च्या ग्रामपंचायत विरुद्ध उपोषणास बसलेले व्यक्ती उपोषण स्थळावरून अचानक गायब झाले होते आणि चार दिवसानंतर गंभीर परिस्थितीत सापडल्याने त्यांना उपचाराकरता शेगाव येथे नेले होते. अशी माहिती आहे अशा परिस्थितीत नव्याने त्याच पंचायत समिती समोर उपोषणाला बसणाऱ्याच्या जीवित्वाची जबाबदारी लक्षात घेता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here