Home बुलढाणा शॉक सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागुन झालेल्या नुकसानाची भरपाई द्या ,अन्यथा कैलाश...

शॉक सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागुन झालेल्या नुकसानाची भरपाई द्या ,अन्यथा कैलाश कडाळे पाटिल यांचे महावितरण कार्यालयास उपोषणाचा ईशारा !

6
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0043.jpg

शॉक सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागुन झालेल्या नुकसानाची भरपाई द्या ,अन्यथा कैलाश कडाळे पाटिल यांचे महावितरण कार्यालयास उपोषणाचा ईशारा !

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर:-संग्रामपूर बोडखा रोड ला लागुन असलेल्या डि,पी, वर शार्टसर्किट मुळे दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी गट नं, १३० मध्ये आग लागुन शिवदास ओंकार घिवे व काशिराम विश्वनाथ कडाळे यांच्या मालकिच्या गोठ्याला आग लागुन सुमारे दोन लाख रूपयाचे शेती उपयोगी वस्तुचे नुकसान झाले होते. महसुल विभागाने तसा रीतसर पंचमाना केला होता .परंतु महावितरण कार्यालय संग्रामपुर यांनी चार महीने ऊलटुन आद्यापही कार्यवाही केली नसुन वरील शेतकऱ्यांस नुकसानभरपाई दिली नाही . महावितरण कार्यालयास माहीती विचारली असता उडवा उडवी ची उत्तरे देत आहेत याची गांभिर्याने दखल घेत नसल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यात अडचन निर्णान होत आहे . वरील विषयाची सात दिवसाच्या आत दखल न घेतल्यास दि.०१ सप्टेंबर २०२२ रोजी महावितरण कार्यालय संग्रामपुर येथे शिवसेनेच्या वतिने आमरण उपोषण करण्यात येईल . त्यामुळे उद्भवणाऱ्या परीनामास सर्वस्वी जबाबदारी महावितरण कार्यालय संग्रामपुर यांची राहील. असे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर शिवसेना उप तालुका प्रमुख कैलाश कडाळे पाटिल , गोकुल घिवे , भैय्या पाटिल ,ज्ञानेश्वर घाईट ,शुभम चंदनपाठ ,रोहन घिवे, निलेश पाटिल व ईतर शेतकरी ,शिवसैनिकांच्या सह्या असुन असे निवेदन शिवसेना संग्रामपुर तालुक्याच्या वतिने देण्यात आले आहे . परंतु विशेष म्हणजे संग्रामपुर तालुक्यात नागरिकांना न्याय व हक्कासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतो परंतु उपोषण करता सुद्धा उपोषणातून गायब केला जातो किंवा होतो याबाबत तपास चालू आहे परंतु संग्रामपूर तालुक्यात अधिकारी वर्गांमध्ये “तेरी भी चूप मेरी चूप” अशा प्रकारे मनमानी चालू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना न्यायासाठी जीव मुठीत धरूनचं या तालुक्यात उपोषणास बसावे लागतो असेच काहीसे म्हणावे लागेल. कारण उपोषण करता गायब होण्याचे असे सुद्धा प्रकार या तालुक्यात घडत आहेत. त्यामुळे होणाऱ्या परिणामास व उपोषणकर्त्याच्या जीवाची सर्वस्वी जबाबदारी लक्षात घेता वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Previous articleपिंपरी गिते शिवारातील पिकांवर ताव मारून पिकांची नासाडी करणारी ५० वानरांची टोळी जेरबंद
Next articleग्रामसेवक वर कारवाई न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषण करणार! काकनवाडा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव यांचा इशारा..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here