Home बुलढाणा भादोला येथील वरली मटका जुगारावर धडाकेबाज कारवाई, मुदेमलाही केला जप्त बुलढाणा ग्रामीण...

भादोला येथील वरली मटका जुगारावर धडाकेबाज कारवाई, मुदेमलाही केला जप्त बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई…

136

आशाताई बच्छाव

1000561964.jpg

भादोला येथील वरली मटका जुगारावर धडाकेबाज कारवाई, मुदेमलाही केला जप्त बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे वरली मटक्याच्या जुगाराची गोपनीय माहिती बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोकुळसिंग राठोड,नापोका सुनील वाघ ब.न २०१६ पोहेका राजू सोनुने बं.न १६२४, यांना मिळाली. भादोला येथील बस स्टँड परिसरात मध्ये सुरडकर जिलेबी सेंटरच्या दुकानाच्या पाठीमागे जुगार खेळल्या जात असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकला असता एका व्यक्तीला वरली मटक्याच्या चिठ्ठ्या लिहिताना दिसला त्याचे नाव कन्हैया मोहन वर्मा वय २५ वर्ष राहणार मिलिंद नगर बुलढाणा अशे त्यांनी सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ वरली मटका आकडे लिहिलेली चिट्टी १ काळा पेन किंमत १० रु एक कार्बन तुकडा, व नगदी १०५० रुपये असा एकूण १०६० रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे, त्या ठिकाणी पंचनामा करून कलम ३५(३) भारतीय नागरिक संरक्षण २०२३ प्रमाणे समज देऊन सोडविण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल हा पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे.

Previous articleलाडकी बहीण योजनेसाठी दलाल सक्रिय ; एका दलाल महिलेवर गुन्हा दाखल..
Next article“आषाढी एकादशी आणि मोहराम निमित्त केले दामिनी लघुचित्रपट प्रसारित”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.