Home जालना मुलीच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर समृद्धी कारखान्याची शेतकऱ्यांसाठी योजना

मुलीच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर समृद्धी कारखान्याची शेतकऱ्यांसाठी योजना

131

आशाताई बच्छाव

IMG-20230627-WA0048.jpg

मुलीच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर
समृद्धी कारखान्याची शेतकऱ्यांसाठी योजना

घनसावंगी/जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-: ऊस उत्पादक सभासद शेकऱ्यांसाठी समृद्धी साखर कारखान्याने एक क्विंटल साखर मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. ही साखर मुलीच्या लग्नासाठी  देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत घनसावंगी तालुक्यातील मुर्मा व खडका येथील शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत घरपोच साखर वितरीत करण्यात आली.

मुर्मा येथील कारखान्याचे सभासद तान्हाजी किसन गपाट व खडका येथील कांताभाऊ हरिभाऊ जाधव यांच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी साखर कारखान्याने कन्यादान म्हणून एक क्विंटल साखर घरपोच दिली. यावेळी कारखान्याचे शेख , आनंदे , उढाण , हरिश्चंद्र भोसले, मंगेश मुकणे, बिभीषण गपाट व गावकरी उपस्थित होते. तर खड्का येथे  ऍग्रो असिस्टंट उढाण यांच्यामार्फत ही साखर पोहच करण्यात आली.  यावेळी शेषनारायण जाधव, दिपक जाधव, विलास जाधव, संकेत जाधव व सोमनाथ जाधव उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या माध्यमातून घरपोच आलेल्या या मदतीने दोन्ही शेतकरी कुटुंब भारावून गेले. त्यांनी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगेना संपर्क करून मदतीबद्दल आभार मानले. तसेच विवाह सोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले.

Previous articleपुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला; लेशपाल जवळगे ह्या तरुणाने धाडस दाखवून वाचवले तिचे प्राण!
Next articleआषाढी एकादशी व बकरी ईद सण शांततेत व उत्साहाने साजरा करा-आ. गोरंट्याल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.