Home पुणे पुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला; लेशपाल जवळगे ह्या तरुणाने धाडस दाखवून वाचवले तिचे...

पुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला; लेशपाल जवळगे ह्या तरुणाने धाडस दाखवून वाचवले तिचे प्राण!

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0020.jpg

पुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला; लेशपाल जवळगे ह्या तरुणाने धाडस दाखवून वाचवले तिचे प्राण!
युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

माढा तालुक्यातील “आढेगावचा “पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारा तरुण लेशपाल जवळगे
तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तू जीवाची बाजी लावून आज एका निरपराध मुलीचा जीव वाचवलास. तुझं खूप खूप कौतुक, अभिनंद. तुझं हे धाडस पाहून समाजातील इतर तरुणही अडचणीत सापडलेल्या मुलींना मदत करतील अशी आशा वाटते. पुण्यात आज एका तरुणाने सदाशिवपेठेत एका तरुणीवर कोयत्याने वार केले. त्यावेळी लेशपाल तिथं होता. प्रसंगावधान दाखवत त्यानं तरुणीवर वार करणा-या तरुणाच्या हातातून कोयता हिसकावून घेतला. या झटापटीत लेशपाललाही किरकोळ जखम झाली आहे. दर्शना पवारच्या खूनानंतर पुण्यात हा दुसरा प्रकार आहे. लेशपालसारख्या धाडसी मुलामुळे त्या मुलीचे जीव वाचले. पण सरकारनंही याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. कायद्याचा धाक अशा माथेफिरूंना बसला पाहिजे.
हेच ते मर्दमावळे ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न कर पुण्यातील पीडित तरुणीला हल्लेखोरापासून वाचवल
‘पीडितेच्या मदतीला कोणी येईना तेव्हा हे पुढे आले आरोपीच्या हातातील कोयता बाजूला पाडला अन आरोपीला पकडुन पोलिसांच्या हवाली केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here