Home पुणे वडगावशेरी_अखेर_नगर_रस्त्यावरील_बीआरटी_काढण्यास_सुरवात # आमदार सुनिल आण्णा टिंगरे याच्या पाठपुराव्याला_यश_वाहतूक_कोंडी_सुटणार

वडगावशेरी_अखेर_नगर_रस्त्यावरील_बीआरटी_काढण्यास_सुरवात # आमदार सुनिल आण्णा टिंगरे याच्या पाठपुराव्याला_यश_वाहतूक_कोंडी_सुटणार

222

आशाताई बच्छाव

Screenshot_20230628-182655_WhatsApp.jpg

#वडगावशेरी_अखेर_नगर_रस्त्यावरील_बीआरटी_काढण्यास_सुरवात

# आमदार सुनिल आण्णा टिंगरे याच्या पाठपुराव्याला_यश_वाहतूक_कोंडी_सुटणार             पुणे,(प्रतिनिधी धनराज खांदवे)

वडगाव शेरी मतदार संघातून जाणाऱ्या नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या रस्त्यावर प्रामुख्याने येरवडा ते खराडी दरम्यानच्या बीआरटी मार्गामुळे या वाहतूक कोंडीत अधिक भर पडत होती. मेट्रोच्या कामामुळे हा बीआरटीमार्ग अर्धवट राहिला होता. त्यामुळे नगर रस्त्यावरील बीआरटीचा मार्ग काढून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी मी महापालिका प्रशासनाकडे वांरवार प्रत्यक्ष भेटी, निवेदने आणि बैठका यांच्या माध्यमातून करत होतो. विधीमंडळ अधिवेशनातही बीआरटी काढा आणि वाहतूक कोंडी सोडवा अशी मागणी मी केली होती. त्यावर संबंधित मंत्र्यांनीही सकारात्मक आश्वासन दिले होते. पालिका भवनासमोर केलेल्या उपोषणाच्या वेळी सुद्धा ही मागणी मी केली होती. माझ्या या आग्रही भूमिकेनंतर पुणे पोलिसांनीही बीआरटी मार्ग काढण्याची भुमिका घेऊन महापालिका प्रशासनाला तशी सूचना केली होती. महापालिका प्रशासनानेही बीआरटी मार्ग काढावा अशी भुमिका घेतली. त्यानंतर पीएमपी आणि पालिका अधिकाऱ्यांनी सयुंक्त पाहणी केली होती. अखेर माझ्या मागणीनुसार वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी काढणे आवाश्यक असल्याचे स्पष्ट झाल्याने बीआरटी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात येरवडा (गुंजन चौक) ते हयात हॉटेल चौक या मार्गावरील बीआरटी काढण्याची कार्यवाही शनिवारपासून सुरु करण्यात आली. त्यामुळे निश्चितपणे या संपूर्ण मार्गावरील बीआरटी काढल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

Previous articleभगुर येथिल नुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा
Next articleपुण्यात तरुणीवर कोयत्यानं हल्ला; लेशपाल जवळगे ह्या तरुणाने धाडस दाखवून वाचवले तिचे प्राण!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.