Home जालना आषाढी एकादशी व बकरी ईद सण शांततेत व उत्साहाने साजरा करा-आ. गोरंट्याल

आषाढी एकादशी व बकरी ईद सण शांततेत व उत्साहाने साजरा करा-आ. गोरंट्याल

237

आशाताई बच्छाव

IMG-20230627-WA0045.jpg

आषाढी एकादशी व बकरी ईद सण शांततेत व उत्साहाने साजरा करा-आ. गोरंट्याल
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : आषाढी एकादशीनिमित्त श्री आनंद स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा आणि पवित्र रमजान बकरी ईद निमित्त जालना जिल्ह्यातील नागरीकांनी शांततेत आणि उत्साहाने साजरी करावी, असे आवाहन जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.
पवित्र बकरी ईदचा सण आणि आषाढी एकादशीनिमित्त श्री. आनंद स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा दि. 29 जून गुरुवार रोजी साजरा होणार आहे. श्री.आनंद स्वामी महाराजांचा पालखी सोहळा हा जालना जिल्ह्यातील बंधूभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे.  या यात्रेमुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा कायमपणे टिकवण्यासाठी मोलाची मदत नेहमीच लाभत आलेली आहे. यापूर्वीही पालखी सोहळा आणि बकरी ईद एकत्रित आलेली असतांना समाज बांधवांनी अत्यंत उत्साहाने आणि शांततेत पार पाडलेले आहेत. इस्लाम धर्मियांचा बकरी ईद हा सण त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असल्यामुळे मुस्लीम बांधव या सणानिमित्त त्याग आणि बलिदानाच्या शिकवणीला उजाळा देतांना आपण सर्वांनी बघितलेले आहे, असे श्री. आ. गोरंट्याल यांनी केले. पालखी सोहळ्याचे मुस्लीम बांधव हे ठिक- ठिकाणी स्वागत करुन बंधू भावाची जोपासना करीत आहेत. जालना जिल्ह्यातील जनतेने श्री. आनंद स्वामी महाराज पालखी सोहळा आणि पवित्र बकरी ईद शांततेत आणि उत्साहाने साजरी करावी, असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आर. आर. खडके, डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, राजेंद्र राख, शेख महेमूद, गणेश राऊत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, महावीर ढक्का, आरेफ खान, शेख शकील, मुस्तकिम हमदुले, धर्मा खिल्लारे, रमेश गौरक्षक, कलीम खान, सय्यद मुस्ताक, अब्दुल हमीद, शेख शमसुद्दीन, सय्यद अझहर, शेख नजीब, सय्यद करीम बिल्डर, मोहन इंगळे, वैभव उगले, शेख इब्राहीम,