
आशाताई बच्छाव
सप्तश्रृंगी गडाच्या शीतकडयावरुन उडी घेत चांदवडच्या प्रेमीयुगुलांची आत्महत्या
(बाळासाहेब निकम)
कळवण – साथ जियेंगे साथ मरेंगे हम तुम दोनो लैला किंवा एक दुजे के लिये अशा स्वरूपाच्या चित्रपट कथेतील नायक नायिका प्रमाणे चांदवडच्या प्रेमीयुगुलांने सप्तश्रृंगी गडाच्या शीतकडयावरुन उडी घेत आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील भायाळे गावातील मंगेश राजाराम शिंदे वय २४ व वडनेर भैरव येथील प्रियंका संतोष तिडके वय १६ या दोघांनी दिनांक २८ एप्रिल रोजी मोटार सायकल क्रमांक एम एच १५,एच जे ५९१५ वरुन वडनेर भैरव येथून सप्तश्रृंगी गडावर आले.या दोघांनी सप्तश्रृंगी गडावरील शीतकडा येथे जाऊन चारशे ते पाचशे फूट खोल दरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले.त्यानंतर मुलीचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत होता तर तरूणांचा मृतदेह खोल दरीत आढळून आला.घटना घडून सहा दिवस झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.या घटनेची माहिती गुराख्यांनी भातोडे ता.दिडोंरीचे पोलिस पाटील विजय चव्हाण यांना दिली त्यानंतर वणी पोलिसांना खबर देण्यात आली वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड व खोल दरीत उतरून मृतदेहाचा पंचनामा केला.वैद्यकीय अधिकां-यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.दरम्यान मृत दोघांचे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले आले.याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.