Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा येथे वाणी युवा मंचकडून जिजाऊ जयंती युवा दिन

सटाणा येथे वाणी युवा मंचकडून जिजाऊ जयंती युवा दिन

94
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा येथे वाणी युवा मंचकडून जिजाऊ जयंती युवा दिन साजरा ( जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                      सटाणा- महाराष्ट्र वाणी युवामंच,(सटाणा) बागलाण व महाराष्ट्र वाणी महिला मंच,सटाणा याच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र वाणी युवा मंच बागलाण तालुकाध्यक्ष श्री योगेश अमृतकार,सटाणा शहर अध्यक्ष श्री किरण अमृतकर व महिला मंच अध्यक्षा सौ.योगिता शिरोरे यांच्या शुभहस्ते झाले.तसेच याप्रसंगी  महाराष्ट्र वाणी महिला मंच च्या अध्यक्षा मा.सौ.योगिता शिरोरे, लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा मा.श्री.माधुरी अमृतकार यांनी मनोगत व्यक्त केले.
तर महाराष्ट्र वाणी युवामंच चे सदस्य मा.श्री.अतुल अमृतकर (सर) यांनी  स्वामी विवेकानंद  आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील आदर्श आजच्या पिढीला कसा मार्गदर्शक ठरेल व तरुणांनी आपल्या स्वतःवरील विश्वासाने कसे जीवन जगता येईल याविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाषण झाल्यानंतर  मा.आप्पाश्री भालचंद्र बागड,मा.श्री.जगदीश बधान, मा.श्री.मनोज पिंगळे,मा.श्री.प्रशांत कोठावदे, मा.सौ.माधुरी अमृतकार  ह्या प्रमुख मान्यवरांनी विविध पद व पुरस्कार मिळविल्या बद्दल त्यांचा मंडळाकडून सत्कार करण्यात आला. ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र वाणी युवामंचचे तालुकाध्यक्ष मा.श्री.योगेश अमृतकार यांनी केले होते. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र वाणी युवामंच,सटाणा शहर,बागलाण तालुका व महिला मंच,सटाणा शहरातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.श्री.सचिन दशपुते यांनी केले.तर समारोप मा.सौ.योगिता शिरोरे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here