• Home
  • देगलूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ चौकाचे नगरअध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण – राष्ट्रपुरुषांच्या पुतळयातुन विचार व संस्कृती ची प्रेरणा मिळते ; प्रा. धुडुकनाळे 

देगलूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ चौकाचे नगरअध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण – राष्ट्रपुरुषांच्या पुतळयातुन विचार व संस्कृती ची प्रेरणा मिळते ; प्रा. धुडुकनाळे 

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210114-WA0090.jpg

देगलूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ चौकाचे नगरअध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण – राष्ट्रपुरुषांच्या पुतळयातुन विचार व संस्कृती ची प्रेरणा मिळते ; प्रा. धुडुकनाळे

नांदेड, दि.१४ – राजेश एन भांगे

देगलूर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपुरुषांचा पुतळा असो चौकाला नाव देणे असो त्यातून समाजाला विचार व संस्कृतीची प्रेरणा मिळते असे सांगून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराचा वारसा महिलांनी जोपासला पाहिजे असे आवाहन प्रा राजेश्वर पाटील धुडुकनाळे यांनी केले.
शहराच्या प्रवेशद्वारावर जिजाऊंचा चौक उभारून नगराध्यक्षांनी देगलूरच्या वैभवात भर घातल्याचे ते म्हणाले.
देगलूर नगरपरिषदेने उदगीर रोड वरील चौकात जिजाऊ यांचे नाव देऊन “चौक ” उभारले असून त्याचा लोकार्पण सोहळा राजमाता जिजाऊ जयंतीदिनी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार हस्ते झाला यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर हे होते.
यावेळी नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार , शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी शितलताई रावसाहेब अंतापूरकर, रोहित साबणे , ॲड. अंकुश देसाई देगावकर , जि.  प .सदस्य बबन पाटील गाेजेगावकर , नगरसेवक अशोक  गन्दपवार , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील ,शैलेश ऊल्लेवार , नितेश पाटील,धोडींबा वानखेडे , सुशील कुमार देगलुरकर , अविनाश निलमवार , प्रशांत पाटील अचेगावकर, शैलेश देशमुख ,शशांक पाटील  , कैलास  येसगे,दत्तोपंत  गुरुजी,  ॲड . रमेश जाधव, सुधाकर पाटील भोकसखेडकर ,ए.पी. आय ,पूनमताई पाटील , बालाजी थड्के , जनार्दन बिरादार, अनिल कदम, सुधाकर थड्के, राहुल थडके,   गजानन पाटील नागराळकर,कोठारे ,  दत्ता पाटील बामणे, संजीवनी ताई सूर्यवंशी, मानुरे मॅडम ,छाया पाटील,  वानखेडे मॅडम यांच्यासह समाजातील महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती होती .
कार्यक्रमाची सुरुवात    डॉ. सुनील जाधव यांच्या  जिजाऊ वंदनाने  झाली . प्रास्ताविकात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील कुशावाडीकर  यांनी नगराध्यक्ष व त्यांच्या टीमने आम्हाला  मा जिजाऊ  च्या नावाने चौक उभारण्याचे दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचे सांगितले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड ,छावा ,मराठा सेवा संघ आदीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे . सूत्र संचालन डॉ.सुनील जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार  किरण बिरादार यांनी मानले.

anews Banner

Leave A Comment