• Home
  • ग्रामपंचायत मतदान मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश.

ग्रामपंचायत मतदान मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210114-WA0039.jpg

ग्रामपंचायत मतदान मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात 1015 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व शांत वातावरणात पार पडण्यासाठी शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021रोजी फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी निर्गमित केले आहेत. या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने 15 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मतदान होणार आहे अशा मतदान केंद्राच्या हद्दीपासून तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील मंडपे सर्व दुकाने मोबाईल कॉर्डलेस फोन पेजर वायरलेस सेट ध्वनिक्षेपक सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

anews Banner

Leave A Comment