• Home
  • मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपणे राजकीय वर्तुळात खळबळ माजली

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपणे राजकीय वर्तुळात खळबळ माजली

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210114-WA0049.jpg

पुणे 14 जानेवारी ⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)
पुणे- मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपणे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, अशात मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाष्य केले आहे, मंत्री मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला त्यांनी ठणकावले आहे. ज्यावेळी अत्याचार झाला त्याचवेळी गुन्हा दाखल करायचा होता एवढ्या दिवस का शांत बसलात असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हंटलंय.

रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया जशास तशी

बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही याची एक महिला म्हणून लाज बाळगा ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला? बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो.

anews Banner

Leave A Comment