Home वाशिम वाशीम : पिस्तूल चा धक दाखवून लुटमार करणारे तिघे जेरबंद

वाशीम : पिस्तूल चा धक दाखवून लुटमार करणारे तिघे जेरबंद

151

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र सुरेश कलकोट- वाशीम तालुका प्रतिनिधी

युवा मराठा न्यूज

वाशीम : पिस्तूल चा धक दाखवून लुटमार करणारे तिघे जेरबंद

वाशिम : पेट्रोल पंपावर पिस्तुलचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आसेगाव पोलिसांना यश आले आहे. प्रिन्स होलपदे, देवानंद धुधमोगरे, एकनाथ चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते सर्वजण हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
वाशिम-मंगरूळपीर रोडवरील बीटोडा येथील पेट्रोल पंपावर पिस्तुलचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याआधारे शोध घेत आसेगाव पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आसेगाव पोलिसांनी त्या तिघांची कसून चौकशी केली. नांदेड, परभणी, यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर चोरी केल्याची कबुली तिघांनी दिली आहे.

Previous articleपुणेत अंगारकी चतुर्थी कार्यक्रम संपन्न
Next articleनाशिक जिल्हा पोल्ट्री योद्धा यांनी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा महामेळावा धोडांबे तालुका चांदवड येथील गोरक्षनाथ मंगल कार्यालय संपन्न झाला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.