Home नाशिक तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाचा २५ लाख भाविकांनी घेतला लाभ

तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाचा २५ लाख भाविकांनी घेतला लाभ

35
0

आशाताई बच्छाव

1000275922.jpg

तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाचा २५ लाख भाविकांनी घेतला लाभ

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

भरवस फाटा ता.निफाड येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याच्या समारोपाच्या दिवशी सकाळी दहा ते बारा पूजेचे कीर्तन हभप एकनाथ महाराज सदगीर यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली कदम उर्फ छोटे माउली यांच्या काल्याच्या कीर्तनाने आनंदमय व उत्साहाच्या वातावरणात सांगता झाली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी मुक्कामी येऊन हजेरी लावली होती. सप्ताह काळात सुमारे २५ लाख भाविकांनी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले. कार्यक्रम संपल्यानंतरही भाविक रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेत होते. कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने कृषी प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली होती. कृषी प्रदर्शनात शेतीला लागणारे बी बियाणे, औषधे, ठिबक सिंचन, पाईप, रोपवाटिका नर्सरी, मिल्किंग मशीन, पशुखाद्य, शेतीविषयक पुस्तके, बचत गट उत्पादने, शेतकऱ्यांना शासकीय विभाग व बँक कर्जाविषयी माहिती, लघुउद्योग, गृह उद्योग आधी उद्योगांचा माध्यमातून विविध कंपन्या व वैयक्तिक व्यावसायिकांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता.
या सप्ताहाचा कालखंडात समता ब्लड बँक नाशिक यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते, तसेच म वि प्र मेडिकल कॉलेज नाशिक यांनीही शेवटच्या दिवशी आरोग्य शिबिरास सेवा उपलब्ध करून दिले. सुमारे २०० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. लासलगाव येथील कृष्णाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आरोग्य शिबिरात दररोज तीनशे ते चारशे लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती.या काळात दररोज ५००० वाचकांचा भव्य दिव्य संगीत गाथा पारायणास सहभाग नोंदविला. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये टाळकरी विनायकरी मृदंग वादक व भजनी मंडळ यांनी दररोज शुभ्र पोशाख परिधान करत कार्यक्रमाचे शोभा वाढविली. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत व अभ्यास व कीर्तनकारांनी उपस्थित भाविकांना अज्ञान केले. सद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकां समोर २४ तास “तुकाराम तुकाराम”या नामाचा अखंड भजन पहारा करताना होणारा हरिनामाचा गजर लक्ष वेधून घेत होता.
या सप्ताहाची समाप्ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर असल्याने जवळपास सव्वा लाख मांडे, एक लाख लिटर दूध, सार व भात असे गोड जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. मांडे वगळता इतर सर्व खर्च लासलगाव बाजार समितीच्या संचालिका सोनियाताई होळकर यांनी केला. कार्यक्रमाच्या मदतीसाठी पाच हजार स्वयंसेवक शेवटच्या दिवशी कार्यरत होते. लोकनेते विद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी महाप्रसाद वाढण्यासाठी मदत केली. समाप्तीच्या सहा तालुक्यातून मांडे जमा करण्यात आले होते. समारोपाच्या काल्याच्या कीर्तनात गुरुवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम( छोटे माऊली ) यांनी देणगीदार, शेतकरी,वारकरी, स्वयंसेवी संस्था, सहभागी झालेले स्वयंसेवक, किर्तन सेवा देणारे कीर्तनकार, तीन-चार महिन्यापासून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहो रात्र झटणारे पंचक्रोशीतील स्वयंसेवक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव यांचे विशेष आभार मानले.

सांगता प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.भारतीताई पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, आमदार आशुतोष काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य डी के नाना जगताप, अमृताताई पवार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, शिवसेना नेते कुणाल दराडे, लासलगाव बाजार समिती माजी सभापती सुवर्णाताई जगताप, सौ तनुजाताई घोलप, वेफको चेअरमन संजय होळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleजनसेवा हिच ईश्वर सेवा’ समजुन कार्य करीत रहावे ः आ. गोरंट्याल
Next articleश्रीमती जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here