Home Breaking News 🛑 पारनेरचा वचपा…! शिवसेनेने कल्याण मधे काढला.🛑 ✍️डोंबिवली :( विजय पवार महाराष्ट्र...

🛑 पारनेरचा वचपा…! शिवसेनेने कल्याण मधे काढला.🛑 ✍️डोंबिवली :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

115
0

🛑 पारनेरचा वचपा…! शिवसेनेने कल्याण मधे काढला.🛑
✍️डोंबिवली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

डोंबिवली :⭕पारनेरमधील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्याने हा प्रवेश राज्यभर गाजला.

या प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिवसेनेने कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देऊन वचपा काढला. शिवसेनेने कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी करत राष्ट्रवादीला धोबीपछाड केल्याने या निवडणुकीची समीकरणेच बदलली.

राजकीय उलथापालथीच्या या घटनेमुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीला सभापती आणि उपसभापतीपदावर पाणी सोडावे लागले.

कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीची 3 असे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते. मात्र रविवारी सकाळी अचानक मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांचे अचानक सूर जुळले. राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

वास्तविक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेचे सभापती व उपसभापतीपदाचे उमेदवार रविवारी अर्ज मागे घेणार होते. तथापी भाजप आमदार किसन कथोरे आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी कल्याण बाजार समिती राष्ट्रवादीच्या कोट्यात घालण्याचा डाव पूर्णत: उधळून लावला. त्यामुळे या पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली. तर, शिवसेनेचे रमेश बांगर उपसभापतीपद मिळाले. या निवडणुकीतील मतदानामध्ये शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांना 7 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना 5 मते मिळाल्याने शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या सभापतीपदी विराजमान झाल्या….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here