Home Breaking News 🛑 सत्ता अबाधित राखायची तर…! सेनेचे नगरसेवक परत पाठवा – उध्दव ठाकरेंचा...

🛑 सत्ता अबाधित राखायची तर…! सेनेचे नगरसेवक परत पाठवा – उध्दव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप..! 🛑 ✍️ मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

98
0

🛑 सत्ता अबाधित राखायची तर…! सेनेचे नगरसेवक परत पाठवा – उध्दव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप..! 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ महाविकास आघाडीतील मतभेदांची मालिका काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे .

यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमचे नगरसेवक परत पाठवा, असा संदेश पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदही चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला.
पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला.

महाविकास आघाडीत मित्रपक्ष असतानाही राज्यात इतर ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांनाच आपल्या पक्षात घेण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाबद्दल शिवसैनिकांकडून चांगलीच नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे काही तक्रारी आल्याचीही माहिती आहे.

‘राज्यातील सत्ता अबाधित ठेवायची असेल, तर शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा’

मित्रपक्षांकडून होणाऱ्या या राजकीय खेळीनंतर उद्धव ठाकरे चांगलेच नाराज असल्याचंही सांगितलं जातंय. राज्यातील सत्ता अबाधित ठेवायची असेल, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना परत पाठवा, असा थेट निर्वाणीचा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना धाडलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोरही महाविकास आघाडीत बिघाडी होऊ द्यायची नसेल तर नगरसेवक परत पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय असल्याचं सध्या दिसत नाही.

उद्धव ठाकरे यांच्या या थेट निरोपानंतर अजित पवार यांनी यावर विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आता यावर नेमका काय निर्णय होतो आणि आघाडीतील मतभेद कोणतं रुप घेतात हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here