• Home
  • **राज्यात लवकरच दहा हजार पदांची पोलीस भरती -उपमुख्यमंत्री**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**राज्यात लवकरच दहा हजार पदांची पोलीस भरती -उपमुख्यमंत्री**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**राज्यात लवकरच दहा हजार पदांची पोलीस भरती -उपमुख्यमंत्री**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
कायदा व सुव्यवस्था भक्कम करण्यासाठी व पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई दहा हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला आहे .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य व वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव , गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव , महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव , पोलीस महासंचालक , एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक व आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकूण 10 हजार पोलीस शिपाई पदांची भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
राज्यात 10 हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येनार आहेत. असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

anews Banner

Leave A Comment