Home भंडारा दुर्गाबाई डोह यात्रेत जनजागृती अंगात अतिंद्रीय शक्तींचा दावा कायद्याने गुन्हा! – हरिभाऊ...

दुर्गाबाई डोह यात्रेत जनजागृती अंगात अतिंद्रीय शक्तींचा दावा कायद्याने गुन्हा! – हरिभाऊ पाथोडे

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20240115_184102.jpg

दुर्गाबाई डोह यात्रेत जनजागृती
अंगात अतिंद्रीय शक्तींचा दावा कायद्याने गुन्हा!
– हरिभाऊ पाथोडे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)
अंगात अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रीय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करुन इतरांच्या मनात भिती निर्माण करणे महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्याने गुन्हा आहे.या कायद्याचा भंग केल्यास सात वर्षांपर्यंत कैद व पन्नास हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक तथा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सदस्य हरिभाऊ पाथोडे यांनी केले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा साकोली आणि राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने दुर्गाबाई डोह यात्रा येथे आयोजित एक दिवसीय जनप्रबोधन शिबीराचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,संत गाडगेबाबांनी अंगात देवी आणणा-यावर कडाडून प्रहार केला. याप्रसंगी उद्घाटक पाहुणे म्हणून जय श्री रंगारी जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, रत्नाकर तिडके, ग्यांनचद जांभुळकर ,राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे रामभाऊ येवले, रमेश गोटेफोडे, सचिव मूलचंद कुकडे, तनुजा नागदेवे, मनोज कोटागले, भावेश कोटागले इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यांनी सुद्धा प्रयोगाच्या माध्यमातून जनतेची फसवणूक कशी केली जाते हे प्रयोगाच्या माध्यमातून समजून सांगितले व जो कोणी चमत्कार सिद्ध करून दाखवेल त्याला 30 लाखाच्या बक्षीस देण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले परंतु डोहावर असलेल्या एकाही अंगात आणणाऱ्या देव्यांनी आव्हान स्वीकारलेला नाही हे विशेष

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाअंनिसचे जिल्हा संघटक डी.जी.रंगारी यांनी केले.
संचालन साकोली तालुका संघटक कागदरा व रंगारी यांनी केले तर आभार तालुका सचिव यशवंत उपरीकर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्राध्यापक असो गायधने नामदेव काणेकर कागदरावर रंगारी डीजे रंगारी ,यशवंत उपरीकर , आशा वासनिक ,अमित नागदेवे ,मनोज कोटागले, देवेंद्र मेश्राम, कार्तिक मेश्राम इतर सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली

Previous articleप्राचार्य सी.डी.रोटे कृतीशील क्रीडा मार्गदर्शक मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित–
Next articleअंबानगरीत होणार भव्य दिव्य विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here