Home गडचिरोली मोदी – 9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत मुरूमगाव येथील अंगणवाडी सेविकांचा सत्कार

मोदी – 9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत मुरूमगाव येथील अंगणवाडी सेविकांचा सत्कार

107
0

आशाताई बच्छाव

IMG-20230616-WA0043.jpg

मोदी – 9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत मुरूमगाव येथील अंगणवाडी सेविकांचा सत्कार

भाजप महिला आघाडीचा उपक्रम

धानोरा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) :-

मोदी-9 महा जनसंपर्क अभियान 30 जुन पर्यन्त राबविण्यात येत आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान होऊन 9 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. या 9 वर्षात त्यांनी केलेले चांगले कार्य व विविध योजना या तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोदी-9 महा जनसंपर्क अभियान 30 मे ते 30 जुन 2023 पर्यन्त राबविण्यात येत आहे. या महा जनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व विविध संस्थांमधील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या पदाधिकारी महिलांचा सत्कार कार्यक्रम सुरू आहे.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील 6 अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचा महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात सत्कार करण्यात आला. यावेळी मुरूमगाव अंगणवाडी केंद्र क्र.1 च्या अंगणवाडी सेविका मिनाक्षी मेश्राम केंद्र क्र. 2 च्या उर्मिला नैताम, केंद्र क्र.3 च्या उषाताई आचलावार, केंद्र क्र. 4 च्या छायाताई रामटेके, बेलगावच्या अंगणवाडी सेविका फुलबाशन मारगिया, खेडेगावच्या रसिका पदा यांचा भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिप सदस्या तथा महिला आघाडी धानोराच्या तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गडचिरोली शहर महामंत्री रश्मीताई बाणमारे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर उपाध्यक्ष ज्योतीताई बागडे उपस्थित होत्या.
यावेळी अंगणवाडी केंद्रावर स्तनदा माता, पोषण आहार लाभार्थी व लहान मुले उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे व जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी यांनी केंद्रातील मोदी सरकारने 9 वर्षात केलेल्या चांगल्या कार्याची, विविध लोकोपयोगी योजनांची व महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली व महिलांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here